Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्…

सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 09, 2025 | 12:14 PM
पुण्यातील मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्...

पुण्यातील मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला. पोलिसांनी पार्लरचालक महिलेला अटक केली आहे. जोयश्री नरेन तामोली (वय ३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या मसाजपार्लर चालक महिलेचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात डे स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली हिला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! तरुणावर कोयत्याने हल्ला, हात मनगटापासून तोडला; कारण काय तर…

पोलिसांकडून तरुणींची सुटका

पुण्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पुणे पोलीस देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रीती मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लर चालक सुनीता नामदेव मांजरे (वय ३३) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police has taken action against the prostitution business running in the name of massage parlor in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
1

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
2

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
3

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
4

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.