Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली अन्…; पिंपरीत मोठा दरोडा

पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्‍या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 01, 2025 | 12:49 PM
वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली अन्...; पिंपरीत मोठा दरोडा

वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली अन्...; पिंपरीत मोठा दरोडा

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, दरोडे, लुटमार, चोऱ्या यासारख्या घटना घडत असतात. अशातच आता पिंपरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्‍या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल बाराशे किलोमीटर पाठलाग करत राजस्थानमधून मुख्य आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगाव येथून पकडले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे.

निगडी प्राधिकरण येथे १९ जुलै रोजी सायंकाळी एका जेष्ठ नागरिकाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी घुसखोरी करत वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम चोरून नेली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये पथकाने सुमारे १२०० किलोमीटर प्रवास केला. तसेच, २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश लादुराम ढाका (२९, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान) आणि त्याच्या साथीदारांना शामनगर, जयपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याशी संबंधित असलेला महिपाल रामलाल बिष्णोई (१९, सध्या रा. वडगाव मावळ) याला तळेगाव येथून अटक केली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे.

आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी आरोपींनी वॉकी टॉकीचा वापर केला. हे पाच जण स्विफ्ट कारमधून आले. घरात घुसल्यावर एकाने निगराणी ठेवली, एकाने पाळत ठेवली तर उर्वरित आरोपींनी लूट केली. परस्पर संपर्कासाठी त्यांनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकी वापरले, ही बाब पोलिसांनी तपासात उघड केली आहे. हे उपकरण आणि बनावट नंबर प्लेटसह गाडीही जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या पथकात दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, महेश खांडे, सोमनाथ मोरे, गणेश कोकणे, नितीन लोखंडे, अमर कदम, विनोद वीर आदींचा समावेश होता.

Web Title: Police have arrested the accused involved in the robbery in pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pimpri Crime
  • Pimpri Police

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
1

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?
2

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
3

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.