Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १८ वा सिझन सुरू आहे. या टी ट्वेंटी आयपीएल क्रिकेट मॅचच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीसाठी सट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 28, 2025 | 12:57 PM
आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

कराड : सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १८ वा सिझन सुरू आहे. या टी ट्वेंटी आयपीएल क्रिकेट मॅचच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीसाठी सट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून सदर गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून या प्रकरणातील साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना झाले असून त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केले आहे.

संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासो कटरे (दोघे रा. कराड) अशी आयपीएल सट्टाप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. कराडमध्ये गत काही वर्षांपासून ‘आयपीएल’वर सट्टा लावला जात आहे. वेळोवेळी पोलिसांनी या सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. मात्र, तरीही दरवर्षी ‘आयपीएल’ सुरू होताच शहरात सट्टा लावण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच गत काही दिवसांपासून शहरात काहीजण ‘आयपीएल’वर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस सट्टेबाजांचा शोध घेत होते.

रविवारी याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. सट्टेबाजारातील साखळीचा शोध घेण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. कोणाच्या वरदहस्ताखाली सट्टेबाजार चालविला जातो, याचीही माहिती पोलिस घेत आहेत.

महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांकडून गोपनीयरीत्या तपास केला जात आहे. त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले असून, त्याठिकाणी छापासत्र सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Police have arrested two people for betting on ipl cricket matches nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • Karad Police
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.