सैदापूर (ता. कराड) येथे जिव्हाळा ढाब्यासमोरील अपार्टमेंटमध्ये असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. बुधवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी दुपारी कोयना वसाहत (ता. कराड) येथे ही घटना घडली आहे.
सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूला बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस टाकीतून पाईपच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरताना पोलिसांनी कारवाई केली आहे.
कार्वे (ता. कराड) येथील एका मद्यधुंद डॉक्टरने भरधाव कार चालवित दोन दुचाकींना उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दोन महिला व एक पुरुष असे तीन जण जखमी झाले आहेत.
कराड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारुंजी (ता. कराड) येथे जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
मसूर (ता. कराड) येथे मेंहदी काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करून लोखंडी पाईप, दांडक्याने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड- पाटण मार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.
कराड शहरातील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ खंडणीसाठी गुंडाने रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेआठाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कराड शहरानजीकच्या विद्यानगर, कृष्णा कॅनॉल बाजूकडून शहरात जाणाऱ्या ईको कारने सुमारे ३०० मीटर अंतरात सात वाहनांना उडविल्याची थरारक घटना घडली आहे. शुक्रवार (दि. २५) रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात…
सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १८ वा सिझन सुरू आहे. या टी ट्वेंटी आयपीएल क्रिकेट मॅचच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीसाठी सट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
कराड पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या आरोपीने बुधवारी (दि.२६) सकाळी पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात कराड तालुका पोलिसांनी त्याला अटक केली होती.