Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक; महसूल विभागातील क्लार्कसह दोघांना ठोकल्या बेड्या

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल, पोलीस आणि वनविभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2025 | 11:41 AM
नोकरीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक; महसूल विभागातील क्लार्कसह दोघांना ठोकल्या बेड्या

नोकरीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक; महसूल विभागातील क्लार्कसह दोघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल, पोलीस आणि वनविभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाखो रुपये उकळणार्‍या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी स्वतः महसूल सचिव असल्याचे सांगत होता. आरोपीला बनावट नियुक्तीपत्रे बनवून देण्यात पुणे महसूल कार्यालयातील सहायक क्लार्कचा सहभाग निष्पन्न झाले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महादेव बाबुराव दराडे (३२, रा. वाकड, मूळ. रा. धाराशिव) आणि रणजीत लक्ष्मण चौरे (३५, रा. धायरी. मूळ. रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील चौरे हा पुणे महसूल कार्यालयात सहायक क्लार्क म्हणून कामाला आहे. एका २२ वर्षीय तरूणाने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून दराडे याच्यावर १० लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, नागेश राख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

दराडे हा रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतो. कामानिमित्ताने शासकीय कार्यालयात ये- जा असल्याने तो अनेकांना महसूल सचिव असल्याचे सांगत होता. तक्रारदार तरुणाची एका त्रयस्त मित्राच्या माध्यमातून दराडे याच्याशी ओळख झाली. नंतर दराडेने तरूणाचा विश्वास संपादीत केला. तरूणाला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देतो, असे सांगून २०२२ ते २५ या तीन वर्षात वेळोवेळी दहा लाख रूपये घेतले. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता.

दरम्यान दराडेला पथकाने अटक केली. त्याची चारचाकी गाडी तसेच वाकड येथील घरातून पोलिसांना बनावट कागदपत्रे सापडली. अनेक नियुक्तीपत्रे, लेटरपॅड, शिक्के मिळाले आहे. यापद्धतीने दराडे याने राज्यातील पंधरा ते वीस जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात दराडे याला चौरे हा बनावट नियुक्तीपत्र बनवून देण्यात मदत करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार पोलिसांनी चौरे यालाही अटक केली.

२० ते २५ जणांच्या फसवणूकीची शक्यता

दराडे याने महसूल सचिव अशी ओळख सांगून राज्यभरातील २० ते २५ जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक शक्यता आहे. त्याच्याकडून पोलीस, वन आणि महसूल विभागाचे बनावट नियुक्तीपत्रे, शिक्के, लेटरपॅड आदी कागदपत्रे जप्त केली आहेत.

आरोपींकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात त्याने अशाप्रकारे राज्यातील आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसाशी संपर्क करावा.

– प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, युनिट दोन.

Web Title: Police have arrested two people for cheating many people with job offers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • Froud News
  • maharashtra
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त
1

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
2

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…
3

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना
4

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.