पुण्यातील 'त्या' खुनाचा 12 तासात छडा, दोघांना अटक; धक्कादायक कारणही समोर
औंध : औंध येथील एका युवकाचा सुतारखडवी परिसरात मृतदेह आढळून आला. औंध पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासात दोघांना अटक करून खुनाचा उलघडा केला. रामदास अशोक दंडवते (वय २८, रा. औंध) असे मृताचे नाव आहे.
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास रोहन मल्हारी मदने, गुरुराज दत्तात्रय मदने व रामदास दंडवते सुतार खडवी परिसरात मद्यपान करत बसले होते. दरम्यान, तिघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये संशयित रोहन मदने याने रामदास दंडवते याच्या डोक्यात दगड घातल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोणास सापडू नये म्हणून दोन्ही संशयितांनी सुतार खडवीजवळच्या झाडीत लपवून ठेवला. सुमारे १० दिवस हा मृतदेह झाडीतच होता.
पाेलिसांनी लोणंद येथून मंगळवारी पहाटे चार वाजता गुरुराज मदने यास अटक केली. अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर, अनिल शिरोळे, अविनाश वाघमारे, पोलिस हवालदार राहुल वाघ, दादासाहेब देवकुळे, पोलिस कॉन्स्टेबल साहिल झारी, प्रमोद इंगळे यांनी ही कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; वर्षभरात सव्वा पाच हजार मद्यपींवर कारवाई
चाैकशीत दिली गुन्ह्याची कबुली
सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज, औंध, खरशिंगे परिसरात तपास केल्यानंतर रामदास दंडवते याचा मृतदेह गोपूजनजीक सापडला. याबाबत तक्रार लीला अशोक दंडवते यांनी दिली. घटनास्थळी कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित रोहन मदने यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यात त्याने गुन्ह्याची कबुली देताना चुलते गुरुराज दत्तात्रय मदने सहभागी असल्याचे सांगितले.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.