Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्…; कोणाला होणार पुरवठा?

कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 02:35 AM
Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्…; कोणाला होणार पुरवठा?
Follow Us
Follow Us:

शासनाने जारी केलेल्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत सूचना
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचा निर्णय
कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित

पुणे: सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या असून, अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यात आला असून, प्राधान्याने केवळ विद्युत दाहिनी (स्मशानभूमी) तसेच रुग्णालयांना गॅस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधालकर यांनी दिली.

शहर आणि जिल्ह्यातील गॅस एजन्सींना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, उपलब्ध गॅस साठा प्रथम अत्यावश्यक सेवांसाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल, ढाबे, खानावळी तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र अत्यावश्यक सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सगळं संपणार! पुण्यात हॉटेल्स, मेसचे लॉकडाउन? विद्यार्थी अन् कामगार ‘गॅस’वर, चिंता वाढली

दरम्यान, कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. काही व्यावसायिकांकडून घरगुती सिलेंडर वापरल्याची माहिती समोर येत असून, अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तपासणी पथकेही सक्रिय करण्यात आली आहेत. गॅस एजन्सींच्या साठ्याची पाहणी, वितरणाची प्रक्रिया तसेच गॅसचा वापर कुठे आणि कसा होत आहे याची तपासणी केली जाणार आहे. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही सुधालकर यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅस सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देत गॅस पुरवठा व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL

पुण्यात हॉटेल्स, मेसचे लॉकडाउन?

पुणे शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते. शिक्षणासाठीराज्यातील तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात येतात.याशिवाय रोजगारासाठी अनेक कामगारही शहरात वास्तव्यास असून, मात्र सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका शहरातील हॉटेल,मेस आणि खानावळी व्यवसायाला बसू लागला आहे.

Web Title: Commercial gas cylinder supply closed in pune hotels mess do not cook iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Commercial LPG Cylinder
  • Iran Israel Conflict
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.