अजित पवार गटाचे बड्या नेत्याच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, पती, सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल
पंढरपूर : पंढरपूर शहरातील एक जणाला गोळ्या घालून खून करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांपैकी दोघांना शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि. ७) दुपारी जुना कासेगांव रस्ता परिसरात पोलिसांनी वेळीच ही कारवाई केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून एकाची हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी पंढरपुरातील तिघेजण पिस्टलसह तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, शहर पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने बुधवारी दुपारी येथील जुना कासेगांव रोड, न्यायालय परिसर, सांगोला रोड या भागात शोध मोहीम सुरू केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. यादरम्यान, पोलिसांनी गोपनीयता ठेवल्याने प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेली होती. गोपनीय माहिती, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज अशा बाबींच्या आधारे शोधमोहीम सुरू असताना अखेर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुना कासेगांव रोड परिसरातून दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
दोन पिस्टल व जीवंत काडतुसे हस्तगत
विशेष म्हणजे हे दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला. पकडलेल्या दोघांकडून दोन पिस्टल व जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये शहरातीलच एक जणाचा खून करण्याच्या ते तयारीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.