Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : महापालिका वाहनतळाच्या परिसरात बड्या जुगार अड्ड्यावर छापा; पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला

मोदी गणपती शेजारी तसेच महापालिकेच्या वाहनतळाच्या परिसरात सुरु असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात सहायक पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2025 | 02:51 PM
महापालिका वाहनतळाच्या परिसरात बड्या जुगार अड्ड्यावर छापा; पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला

महापालिका वाहनतळाच्या परिसरात बड्या जुगार अड्ड्यावर छापा; पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मोदी गणपती शेजारी तसेच महापालिकेच्या वाहनतळाच्या परिसरात सुरु असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात सहायक पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला असून, त्यासोबतच प्रविण बोदवडे, विजय महाडिकसह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुगार खेळणाऱ्या सहाय्यक फौजदार यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश भुजबळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन प्रविण काशिनाथ बोदवडे (वय ४४, रा. कात्रज) याच्यासह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा जुगार अड्डा विजय महाडिक चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केल्याचे समजते. महेश महादेव भुतकर असे निलंबित केलेल्या सहायक पोलीस फौजदाराचे नाव आहे. ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीत नेमणुकीला होते. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.

३३ जणांना घेतले ताब्यात

पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे वारंवार सूचना देत आहेत. पण, छुप्या पद्धतीने जुगार अड्डे सुरूच असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, विश्रामबाग पोलिसांना नारायण पेठेतील मोदी गणपती शेजारील हरिभाऊ साने वाहनतळाच्या परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. तेथे जुगार खेळणार्‍या ३३ जणांना ताब्यात घेतले. त्यात पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस फौजदारही जुगार खेळत असल्याचे आढळून आले. वाहनतळाच्या टेरेसवरील खोलीत हा जुगार खेळला जात होता. खेळातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा माल जप्त करण्यात आला.

इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा

गेल्या काही दिवसाखाली कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन राेख रक्कम, माेबाईल व माेटरसायकली व इतर साहित्य असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल सुनिल दत्तात्रय बाईत यांनी फिर्याद दिली आहे. कबनूर येथील परीट गल्लीत राहणाऱ्या रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी रात्रीच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.

Web Title: Police have raided a gambling den in the municipal parking lot area and taken action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?
1

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
2

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Crime News : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार
3

Crime News : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…
4

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.