अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस 'अॅक्शन मोड'वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त
मंगळवेढा : मरवडे येथे विजयकुमार येडसे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांनी छापा टाकून रोख रक्कम, मोटर सायकली, मोबाईल, चारचाकी वाहने, असा ९ लाख ५० हजार रपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे मंगळवेढा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रदीप कांबळे (जत.), सिताराम बागल (मरवडे), परमानंद उर्फ करण कांबळे (जत), नवनाथ कांबळे (बेगमपूर), सुरेश गोडसे (सिध्देवाडी), विजयकुमार येडसे (मरवडे), रवी बोरगीकर (जत), बसवराज कोळी (जत), महेश बिराजदार (इंड), सुभाष जाधव (चडचण), महादेव नाईक (जत), दुंडेश दिवेकर (जत), सुधाकर लुती (जत), मंगेश जाधव (सिध्देवाडी), समीर मुजावर (मरवडे), राजकुमार बजयंत्री (चडचण), चंद्रकांत पवार (येड्राव), परमेश्वर कांबळे (जत) आदी १८ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक १८ रोजी दुपारी ३ वाजता पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांना मरवडे येथे एका शेतात दोन जुगार अड्डे सुरु आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानूसार पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक विरसेन पाटील, पोलिस अंमलदार मिसाळ यांच्यासह स्वत: अंजना कृष्णा व्ही. एस. या मरवडे येथे खासगी वाहनाने हजर झाल्या. अलिकडेच वाहने उभी करुन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या १८ जणांना पकडण्यात आले. दोन ठिकाणी गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. सर्वांची अंगझडती घेण्यात आली. दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, चारचाकी वाहने असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पंढरपूर ग्रामीणचे पोलिस अंमलदार गणेश पाटील यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली.
स्थानिक पोलिसांना कशी माहिती नाही?
दरम्यान मरवडे बोराळे बीटमध्ये येत असून तालुक्यातील सर्वात मोठे २१ गावचे बीट म्हणून ओळखले जात आहे. हे बीट कर्नाटक सिमेलगत असल्याने एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व अन्य पोलिस कर्मचारी येथे कार्यरत आहेत. एवढे मोठे जुगार अड्डे सुरु असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी नाही? असा प्रश्न नागरिकातून केला जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी निष्क्रिय पोलिसावर काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मागील वर्षी पंढरपूर येथील आयपीएस अधिकाऱ्याने मरवडे परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली होती. पुन्हा याच परिसरात ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.