Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांना घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रोड याठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले आहेत. या कारवाईत ६ दुचाकी, ९ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2025 | 11:32 AM
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांना घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांना घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा
  • तेरा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी : गेल्या काही महिन्यापासून इचलकरंजीत जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांंकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रोड याठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले आहेत. या कारवाईत ६ दुचाकी, ९ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १३ जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोनेमाळ परिसरातील खंडेलवाल इ‌मारतीच्या पहिल्या मजल्यावर तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तौसिफ रशिद मुल्ला (वय ३६ रा. गोकुळ चेंकि), अतुल चंद्रकांत पेटकर (वय २९), संकेत उमेश म्हात्रे (वय २९ दोघे रा. भोनेमाळ), केतन किरण घोरपडे (वय ३० रा. पाटील मळा) व वरुण जगदीश जगवाणी (वय २६ रा. यशवंत कॉलनी) हे पाचजण तीनपानी जुगार खेळताना मिळून आले. त्याचबरोबर जुगार अड्डा चालविणारा प्रकाश रविंद्र हुंडेकरी आणि इमारत मालक खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ४ मोबाईल, रोकड, डिव्हीआर, जुगाराचे साहित्य असा १ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम गजबर सनदी यांनी फिर्याद दिली आहे.

तर शेळके मळा जॅकवेल रोड परिसरातील एका खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असता तेथे अड्डाचालक विश्वनाथ विलास लवटे (वय ४१ रा. लिगाडे मळा), अक्षय पाटील (रा. चंदर), कबीर खुदबुद्दीन मोमीन (रा.भीनेमाळ), शरद किशोर पाटील (रा. कबनूर) व संतोष हात्रे (रा. कोरोची) हे जुगार खेळाताना मिळून आले. कारवाईत ५ मोबाईल, ६ दुचाकी, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा १ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल पवन दिलीप गुरव यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Police have taken major action by raiding a gambling den in ichalkaranjit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.