Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला आणि सगळं उघड झालं

कल्याणीनगर येथील निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर येरवडा पोलिसांनी छापा कारवाई केली अन् वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 18, 2025 | 12:26 PM
पुण्यातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला आणि सगळं उघड झालं

पुण्यातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला आणि सगळं उघड झालं

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील वेश्या व्यवसाय बहुचर्चित आणि सातत्याने वादातित राहिलेला असून, पुन्हा एकदा एका प्रकरणाने ती आठवण झाली आहे. कल्याणीनगर येथील निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर येरवडा पोलिसांनी छापा कारवाई केली अन् वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. कारवाईनंतर पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून लॉजच्या मालकासह तिघांनी संगनमताने वेश्या व्यवसाय चालविल्याचे म्हटले. मात्र, असे असताना गुन्हा केवळ दोघांवर दाखल केला. यात मालक महिलेला आरोपी न केल्याने पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना हात आखडता का घेतला, असा चर्चा सुरू झाली आहे.

येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणीनगर येथे स्प्रिंग ब्रुक्स लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. माहितीनुसार येरवडा पोलिसांनी येथे कारवाई केली. पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या सुचनेननुसार पथकाने छापा टाकला. लॉज व्यवस्थापक अमोल तांबडे (वय २८, रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि एजंट बंटी या दोघांना अटक केली. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ सह, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. लॉजच्या खोली क्रमांक १०२ मध्ये एक २६ वर्षीय पीडित तरुणी आढळून आली. तिला आरोपींनी जबरदस्तीने वेश्या व्यवसायास ठेवले असे म्हंटले आहे. दरम्यान, पोलिसांनी छाप्यादरम्यान गुन्ह्याशी संबंधित काही पुरावे जप्त केले. लॉजमध्ये असलेल्या नोंद वहीत संशयास्पद नोंदी आढळून आल्या.

पंचांसमक्ष पडताळणी

पोलिसांना संबंधित लॉजवर छापा टाकण्यापूर्वी दोन पंचांना पाचारण केले होते. तसेच, बनावट ग्राहकाकडे सात हजार रुपये रोख दिले होते. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा बनावट ग्राहकाकडील सात हजार रुपये आरोपींकडे सापडले. त्या नोटांचे नंबरही जुळले आहेत, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच, लॉजमधून अन्य पुरावे पंचासमक्ष गोळा करण्यात आले आहेत. मात्र, यात महिलेला आरोपी केले गेले नाही.

याप्रकरणात संबंधित महिलेच्या सहभागाविषयी चौकशी सुरू आहे. चौकशीत तिचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास तिच्यावर गुन्हा दाखल करता येईल. – हिमंत जाधव (पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार)

Web Title: Police have taken major action by raiding the prostitution business in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना
1

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी
2

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
3

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
4

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.