Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष कोमकर खून प्रकरणी मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह 11 जणांवर थेट…

ऐन गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरामध्ये एका टोळीने १८ वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2025 | 12:02 PM
आयुष कोमकर खून प्रकरणी मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह 11 जणांवर थेट...

आयुष कोमकर खून प्रकरणी मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह 11 जणांवर थेट...

Follow Us
Follow Us:

पुणे : ऐन गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरामध्ये एका टोळीने १८ वर्षीय तरुणाची हत्या केली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव आयुष कोमकर (वय १८) असे आहे. वर्षभरापूर्वी (1 सप्टेंबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याचाच बदला घेण्यात आला आहे. आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा 18 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याला आंदेकर टोळीने टार्गेट करून हत्या केली आहे. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून खून केला. आयुष याच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Police have taken major action in the ayush komkar murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार
1

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या
2

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
3

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
4

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.