मुलीला शाळेत सोडून येत असताना वाटेत गाठून केला हल्ला!
निलेश काळोखे हे आपल्या मुलांना सोडायला शाळेत गेले होते. मुलांना शाळेत सोडून येत असताना ५ ते ६ जण मागून आले आणि काही कळण्याच्या आतच त्यांनी वार करायला सुरुवात केली. बाजूला रस्त्यावर पडलेलं दगड, तलवारी, कोयते यांनी जवळपास अंगावर २७ वार केले आणि त्यात निलेश काळोखे यांचा खून करण्यात आला. हल्ला एवढा भयानक होता की जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलला नेण्याच्या आतच त्यांनी जागेवर जीव सोडला.
सुनील तटकरे यांच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप
सुनील तटकरे यांच्या पक्षातील लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना अटक करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की या प्रकरणात आम्ही कोणाला सोडणार नाही. कडक शिक्षा दिली जाईल. सुनील तटकरे यांनी सांगितलं की या प्रकरणात एस आय टी स्थापन करून चौकशी केली तरी चालेल. या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करावी. या प्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Ans: मुलांना शाळेत सोडून परतताना ५–६ जणांनी तलवार, कोयते व दगडांनी हल्ला केला.
Ans: होय, नगरसेविका पत्नी निवडून आल्याचा रागातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Ans: दोन मुख्य आरोपींना अटक, १० जणांवर गुन्हे दाखल; SIT चौकशीची मागणी होत आहे.






