अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंढरपुरात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार
अटक आरोपी अब्दुल कादर राशीद शेख याच्या जवळून चौकशी करून त्या आधारावर, बंगळूर मधील ३ एमडी ड्रग्सचे कारखाने उद्ध्वस्त केले असून, यामध्ये तब्बल ५५ कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ३१ डिसेंबर पूर्वी केलेल्या या कारवाईमुळे कोकण टास्क फोर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्यची स्थापना केली आहे. याची राज्यात सध्या ६ ठिकाणी विभागीय कृती कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाच्या कोकण फोर्स ने रविवारी वाशी गाव परिसरात अमली पदार्थांची विक्री करणारा आरोपी अब्दुल शेख याला अटक करून, जवळपास दीड कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.
पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत बंगळूर येथे त्याचे कारखाने असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एमडी ड्रग्स बनवणारा बेळगाव मधील रहिवासी प्रशांत यल्लाप्पा पाटील याला निष्पन्न करून अधिक तपास केला असता, प्रशांत पाटील याच्या बंगळूर येथील ३ कारखान्यात एमडी ट्रक बनवले जात असल्याची माहिती मिळाली.
बंगळूरमध्ये ड्रग्सची विक्री करणारे सुरज रमेश यादव व रामलाल बिश्नोई यांची नावे समोर आल्यावर पोलिसांनी आधी सुरज यादव व रामलाल बिश्नोई या दोघांना अटक केली. सुरज व रामलाल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर कोकण टास्क फोर्सने बंगळूर शहरातील स्पंदना लेआउट कॉलनी, एनजी गोलाहळी भागातील आर जे इव्हेंट नावाची फॅक्टरी, तसेच यरपनाहळी कन्नूर, येथील लोकवस्तीमध्ये असलेल्या एका घरात छापा मारून ४ किलो १०० ग्रॅम एमडी ड्रग्स, तसेच द्रव स्वरूपातील १७ किलो एमडी ड्रग असे एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्स बनवण्याचे साहित्य, असा एकूण ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तीनही कारखाने अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोकण पथकाने उद्ध्वस्त केले आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






