Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशिरसमधील ‘त्या’ तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

माळशिरसमधील तरुणीच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गावात ग्रामसभा झाल्याची माहितीच जेजुरी पोलिसांकडून मिळाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 02:35 PM
माळशिरसमधील 'त्या' तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

माळशिरसमधील 'त्या' तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Close
Follow Us:

सासवड : माळशिरस येथील नीलम गायकवाड या युवतीचा तिच्याच गावातील मित्राने खानवडीच्या गायरानात अत्यंत निर्घुणपणे खून केल्याचे उघड झाल्यानंतर माळशिरस गावच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गावात ग्रामसभा घेवून घटनेचा निषेध करून आरोपीला फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. घटनेचा भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर स्वतः तपास करीत आहेत. मात्र गावात ग्रामसभा झाल्याची माहितीच जेजुरी पोलिसांकडून मिळाली नसल्याचे स्वतः गौर यांनी सांगितले आहे. त्यातूनच जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

 

१ एप्रिल रोजी आरोपी अनिकेत जाधव या आरोपीने त्याची मैत्रीण नीलम गायकवाड हि कॉलेज वरून घरी परतत असताना सायंकाळी साडेपाच च्या सुमारास गोड बोलून खानवडी जवळील गायरान क्षेत्रात नेले. तिथे गेल्यावर तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला अज्ञात फोन आला असता तिच्यावर संशय घेवून तिथे हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून आणि गळा दाबून निर्घुणपणे खून केला. त्यानंतर आरोपी स्वतःहून जेजुरी पोलिसांत हजर झाला. यानंतर खुनाची घटना उघडकीस आली.

दरम्यान खुनाची घटना उघडकीस येताच माळशिरस ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी आरोपीच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याची ग्रामस्थांनी भूमिका घेतली. यावेळी सासवड- माळशिरस या रस्त्यावर काहीकाळ तणावही निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून घटनेचा जोरदार निषेध केला. आरोपीसह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्याची मागणीही केली. यावेळी जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. मात्र सासवड मध्येच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय असून, राजेंद्रसिंह गौर स्वतः तपास करीत आहेत. मात्र गावातील परिस्थितीची माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच माहिती का दिली नाही ? याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी संपूर्ण घटनेचा क्रम सांगितला आहे. सायंकाळी ५ वाजता कॉलेज सुटल्यानंतर आरोपी अनिकेत जाधव नीलम गायकवाडला घेऊन ५. ३० वाजता खानवडी जवळील गायरानमध्ये आला. तिथे तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर ती मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. त्यानंतर काही वेळाने मृतदेहास मुंग्या लागण्यास सुरुवात झाल्यानंतर रात्री ९. वाजता आरोपी त्याच्या दुचाकीवरून जेजुरीकडे निघाला. रात्री ९ ३० वाजता जेजुरी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांना हकीकत सांगितली. रात्री ९. ४५ वाजता पोलीस आरोपीला घेवून निघाले आणि रात्री १०.१५ च्या दरम्यान घटनास्थळावर पोहचले. त्यानंतर सासवड पोलिसांना माहिती देण्यात आली. सासवड पोलीस तिथे पोहोचताच रुग्णवाहिका बोलावून मृतदेह सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर युवतीच्या कुटुंबियांना संपर्क करून त्यांना बोलाविण्यात आले.

हे सुद्धा वाचा : साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप; राज्यातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची विक्रमी निर्मिती

…त्यांचीही चौकशी करण्यात येणार

आरोपी अनिकेत जाधव आणि नीलम गायकवाड बोलत असताना नीलमला एक फोन आला. त्यानंतर काही वेळातच नीलमची अनिकेत याने हत्या केली. तसेच नीलमची हत्या केल्यानंतर आरोपीने संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तींना फोन करून दमबाजी केल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यामुळे आरोपीने कोणाला फोन केले याची माहिती घेण्यात आली असून, त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. अशी माहिती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी दिली आहे.

Web Title: Police officers have given shocking information in the murder of a young woman in malshiras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Malshiras

संबंधित बातम्या

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ
2

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार
3

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
4

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.