Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील गोविंद शिवाजी कागदे (वय २७) याचा पत्नी अंजली कागदे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2026 | 05:28 PM
लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून
  • चाकूने वार करून दगडाने ठेचून संपवलं
  • पत्नी आणि प्रियकराला अर्ध्या तासात अटक
भूम : वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील गोविंद शिवाजी कागदे (वय २७) याचा पत्नी अंजली कागदे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना वाशी पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतले आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद कागदे याचा सहा महिन्यांपूर्वी वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील बाळासाहेब चौधरी यांची मुलगी अंजली हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाहापूर्वीपासूनच अंजलीचे तिच्या आत्याचा मुलगा शुभम सुभाष खोसे (वय २६, रा. चांदवड, ता. भूम) याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांचीही विवाह करण्याची इच्छा होती. मात्र, अंजलीच्या वडिलांनी तिचा विवाह गोविंद याच्याशी लावून दिला होता. विवाहानंतरही अंजली आणि शुभम यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. गोविंद हा त्यांच्या संबंधांत अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याचा खून करण्याचे ठरवले. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांनी गोविंदला फोन करून कुंथलगिरी घाटाजवळील रामकुंड परिसरातील वाकवड तलावाजवळील डोंगराळ भागात बोलावून घेतले. तेथे गोविंदला दारू पाजल्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली. यावेळी झालेल्या वादातून दोघांनी गोविंदच्या गळ्याजवळ आणि छातीवर चाकूने वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला.

दरम्यान, गोविंदच्या आरडाओरड्याचा आवाज जवळच दरीत जनावरे चारत असलेल्या एका गुराख्याने ऐकला. त्याने दोघेजण एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे पाहिले. त्यानंतर गुराख्याने वाकवड येथील मारकड नावाच्या व्यक्तीला फोन करून घटनेची माहिती दिली. मारकड यांनी तत्काळ वाशी पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शुभम खोसे आणि अंजली कागदे हे हे जंगलाच्या दिशेने पळून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. झराड, पोलीस हवालदार कपिल बोरकर, बाळासाहेब औताडे, विठ्ठल मलंगनेर, नासेर सय्यद, पप्पू पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. रामकुंड परिसरातील वाकवड तलावाजवळ खुनाची घटना घडल्यानंतर गुराख्याने दिलेल्या माहितीवरून वाशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जंगलाच्या दिशेने पळून जाणाऱ्या पत्नी अंजली आणि शुभम खोसे यांचा पोलिसांनी पाठलाग केला. घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासात दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोविंद कागदे यांची हत्या कुठे झाली?

    Ans: भूम तालुक्यातील कुंथलगिरी घाटाजवळील रामकुंड परिसरातील वाकवड तलावाजवळील डोंगराळ भागात ही घटना घडली.

  • Que: गोविंद कागदे यांच्या हत्येप्रकरणी कोणाला ताब्यात घेतले आहे?

    Ans: पत्नी अंजली कागदे आणि तिचा प्रियकर शुभम सुभाष खोसे या दोघांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Que: गोविंद कागदे यांची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गोविंद यांच्या गळ्याजवळ आणि छातीवर चाकूने वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून त्यांची हत्या केली.

Web Title: An incident has occurred in which a wife with the help of her lover murdered her husband nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
1

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

आधी डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला; अहिल्यानगरमध्ये खळबळ
2

आधी डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

Sangamner Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीचा धक्कादायक बनाव उघड
3

Sangamner Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीचा धक्कादायक बनाव उघड

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले
4

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.