Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गावरील बारमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजता पोलिसांनी बारलगतच्या खोलीवर छापा टाकला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2026 | 04:31 PM
सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

नागपूर : सावनेर तालुक्यातील चनकापूर येथील आर. एस. बियर बारवर खापरखेडा पोलिसांनी धाड टाकून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी, जुगाराचे साहित्य व इतर वस्तूंसह एकूण ६ लाख ७३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गावरील बारमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, रात्री सुमारे १० वाजता पोलिसांनी बारलगतच्या खोलीवर छापा टाकला. तेथे आठ जण जुगार खेळताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व आरोपींना सूचनापत्रावर मुक्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विलास करंगामी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सिर्सीतील जुगारावर धाड, दोघांना केली अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे उमरेड तालुक्यातील सिर्सी येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर धाड टाकून दोघांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोपेड, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ९७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा सिर्सी येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी त्यांना काही व्यक्ती जुगार खेळताना आढळले.

पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

पोलिसांनी राहुल सुभाष लाडे (३१, रा. सिर्सी) व संजय देवराव उरकुडे (४४, रा. वॉर्ड क्र. १, सिर्सी) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५२ ताशपत्ते, ८ हजार ५६० रुपये रोख, ६० हजार रुपये किमतीची मोपेड, ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन तसेच इतर साहित्य, असा एकूण ९७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बेला पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना मोठा धक्का ! डॉक्टर मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी

Web Title: Police raid a bar in savner taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News
  • police Raid

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
2

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार
3

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
4

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.