शिक्षिकेचे आपल्याच विद्यार्थिनीच्या वडिलांशी शारीरिक संबंध; नग्न फोटो दाखवत मागितले तब्बल 20 लाख
नागपूर : एका फ्लॅटमधून सुरू असलेल्या देह व्यवसायाचा भांडाफोड करण्यात आला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गोपनीय माहितीवरून धाड टाकत सदर पोलिस ठाण्यांतर्गत ही कारवाई केली. एका महिलेसह दोन आरोपींना अटक करून दोन पीडित महिलांची त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली.
हेदेखील वाचा : रवींद्र वायकर यांच्यानंतर शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याच्या खासदारकीला आव्हान; समन्सही बजावलं
अर्पणा सचिन नाईक (वय 40) आणि फिरोज खान अब्दुल्ला खान (वय 52, रा. गड्डीगोदाम, सुंदरबाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सदर ठाण्यांतर्गत पागलखाना चौकातील चिटणवीसनगर लेआऊट परिसरात एक फ्लॅटमधून देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी त्यांच्या पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. पंटरने सौदा ठरताच पोलिसांना इशारा दिला आणि धाड टाकण्यात आली.
फिरोज खान पोलिसांच्या हाती लागला. फ्लॅटच्या झाडा-झडतीत दोन पीडित महिलाही पोलिसांना मिळाल्या. चौकशीत फिरोजने अर्पणासाठी ग्राहक शोधण्याचे काम करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी फिरोज व अर्पणाविरुद्ध सदर पोलिसात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. अर्पणा फरार होती. तिला नंतर तिच्या नातेवाईकाच्या घरून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 3 मोबाईल, रोकड व इतर साहित्य असा एकूण 41 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
पैसे जमा करण्यासाठी अल्पवयीनचा वापर
अर्पणा नाईक ही विवाहित आहे. मात्र, पतीपासून वेगळी राहते. झटपट पैसे कमावण्यासाठी तिने कुंटणखाना चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. गरीब, गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून देहविक्रीच्या जाळ्यात अडकवते. यापूर्वी सुद्धा पोलिसांनी देहव्यवसायात तिला अटक केली आहे. वर्षभरापूर्वी तिने पागलखाना चौकातील चिटणविसनगर लेआउट परिसरात भाड्याच्या खोलीत व्यवसाय सुरू केला होता. प्रति ग्राहक 1200 रुपये घेऊन पीडित महिलांना केवळ 500 रुपये देत होती. विशेष म्हणजे तिने ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी एका अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले होते.
आर्थिक परिस्थितीमुळे अडकल्या जाळ्यात
यातील एक पीडित महिला ग्रामीण भागात राहणारी असून ती विवाहित आहे. मागील काही महिन्यांपासून ती पतीपासून वेगळी राहते. आईवर कर्जाचा डोंगर आहे. कर्ज फेडण्यासाठी ती सहज या व्यवसायाकडे वळली. तर, दुसरी महिला शहरातील असून ती सुद्धा विवाहित आहे. आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असल्याने ती सहज या व्यवसायात ओढली गेली.
हेदेखील वाचा : विदर्भात मनसेला उमेदवार मिळेना; पक्ष निरीक्षकालाच ठोकावा लागतोय तळ