Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: आठवडे बाजारात पोलिसांची धडक कारवाई; बंगळुरूसाठी निघालेल्या गांजा तस्कराला अटक

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी २.१० लाखांचा १० किलो गांजा जप्त करून इरफान पाशा या तस्कराला अटक केली. तो बंगळुरूस विक्रीसाठी निघाला होता. न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 07, 2025 | 01:40 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: शहानूर मिया दर्गा चौकातील आठवडे बाजाराच्या मैदानात गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. जवाहरनगर पोलिसांनी २ लाख १० हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा तो बंगळुरूला विकण्यासाठी घेऊन जात होता. ट्रॅव्हल्समध्ये बसण्याआधीच पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. ही कारवाई रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव इरफान पाशा आरीफ पाशा (वय ४२, रा. भंगी कॉलनी, पेन्शन मोहल्ला, दक्षिण बंगळुरू, राज्य कर्नाटक) असे आहे.

Sangli Crime: सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, लग्नाला 1 वर्षही नाही झाले अन्….

कशी केली कारवाई

जवाहरनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की निळे शर्ट घातलेला एक व्यक्ती शहानूरमिया दर्गा चौकातून ट्रॅव्हल्सने गांजा घेऊन जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी लगेचच सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी दर्गा चौकातील आठवडे बाजार मैदानावर सापळा लावला. त्री साडेनऊच्या सुमारास संशयित इरफान येताना दिसला. तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करत काही अंतरावरच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील दोन बॅगांमध्ये गांजा मिळून आला. तो हा गांजा बंगळुरू येथे विक्री करण्यासाठी ट्रॅव्हल्सने घेऊन जात होता, अशी कबुली त्याने दिली. त्याच्याकडे १० किलो १७५ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपास सुरु

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव, पोलीस अंमलदार संदीप क्षीरसागर, बनकर, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांनी पार पाडली. असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करत आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या निराशातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

विजेच्या तीव्र धक्क्याने मायलेकाचा मृत्यू; लाकडावर लावलेली तार तुटून पडली अन्…

Web Title: Police raid weekly market ganja smuggler heading for bangalore arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार
1

Delhi Crime: गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार

Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा!  22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?
2

Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा! 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

Chhattisgarh Crime: झोपेत असलेल्या कुटुंबावर कुऱ्हाडीने सपासप वार; तिघांचा मृत्यू तर…
3

Chhattisgarh Crime: झोपेत असलेल्या कुटुंबावर कुऱ्हाडीने सपासप वार; तिघांचा मृत्यू तर…

Satara Crime: पर्यटनमार्गावर थरारक घटना! आंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला; फॉरेन्सिक तपास सुरू
4

Satara Crime: पर्यटनमार्गावर थरारक घटना! आंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला; फॉरेन्सिक तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.