Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bunty Dixit Murder Case : हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती

Bunty Dixit Murder Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेश उर्फ बंटी दीक्षित यांच्या हत्येप्रकरणी आरोपी पवन याने रावण दहनाच्या कार्यक्रमातच हत्येचा कट आखल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमुळे रामलीला मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त असल्याने त्याने हा बेत बदलल्याचे तपासात समोर आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 24, 2026 | 08:55 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  • चौकशीतून शस्त्राचा ठावठिकाणा 
  • मैदानात कट्टा फेकला, मग पोलिस ठाणे गाठले 
  • लॉकअपमध्येही वर्चस्वाचीच भाषा 
Bunty Dixit Murder Case : वर्चस्वाच्या संघर्षातून देवेश ऊर्फ बंटी दीक्षित याची भररस्त्यात हत्या करणाऱ्या पवन पराशरने हत्येचा कट आधीच आखला होता. रामलीला मैदानावरील रावण दहनाच्या कार्यक्रमात बंटीला संपवण्याचा त्याचा बेत होता. त्यासाठी दांडिया कार्यक्रमात जाऊन त्याने रेकीही केली; मात्र राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने त्याने हा डाव बदलला. अखेर एन-७ परिसरात बंटीची हत्या केल्यानंतर पवनने वापरलेला गावठी कट्टा आणि नऊ काडतुसे एन-८ परिसरातील मैदानाजवळ फेकून दिली. नंतर तो स्वतःहून सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला.

शुक्रवारी न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बंटी आणि पवन यांच्यात गेल्याअनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. या संघर्षांत बंटी आपल्यावर वरचढ ठरत असल्याचा राग पवनच्या मनात होता. रामलीला मैदानावरील रावण दहनाच्या कार्यक्रमात बंटी सक्रिय असतो, हे माहीत असल्याने पवनने तेथेच हल्ला करण्याची योजना आखली होती. दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याने रामलीला मैदान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. दांडिया कार्यक्रमात जाऊन परिसराची पाहणी केल्यानंतर पवनने तेथील हत्येचा बेत रद्द केला. मात्र, बंटीविषयीचा राग कायम राहिला आणि पुढे एन-७परिसरात त्याची हत्या झाली.

चौकशीतून शस्त्राचा ठावठिकाणा

अटकेनंतर चौकशीदरम्यान पवनने शस्त्र फेकलेल्या ठिकाणाची माहिती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक अनिल नाणेकर आणि हवालदार मंगेश पवार यांच्या पथकाने परिसराची पाहणी करून गावठी कट्टा हस्तगत केला. तपास अधिकारी योगेश गायकवाड यांनी शस्त्र जप्त केल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी आरोपीला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे सांगितले.

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?  

मैदानात कट्टा फेकला, मग पोलिस ठाणे गाठले 

बटीची हत्या केल्यानंतर पवन थेट पोलीस ठाण्यात गेला नाही. तो एन-८ मधील शासकीय रुग्णालयाच्या गल्लीकडे गेला. औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेसमोरील मोकळ्या मैदानाजवळून जाताना त्याने चालत्या वाहनातून गावठी कट्टा आणि नऊ काडतुसे फेकली. कट्टा रस्त्यालगतच्या गवतात पडल्याने तो सहज नजरेस आला नाही. त्यानंतर पवन सिडको पोलीस ठाण्यात स्वत हुन हजर झाला.

लॉकअपमध्येही वर्चस्वाचीच भाषा

बंटी प्रत्येक कामात अडथळा आणत होता. त्याला स्वतःलाच मोठा भाई समजायचा आपणही कमी नाही, हे दाखवायचे होते, अशा आशयाची बडबड पवन लॉकअपमध्ये करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बंटी दीक्षित यांच्यावर शुक्रवारी दुपारी सेंट्रल नाका स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Taloja Firing Case: तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी पुण्यातून ताब्यात; आंबेगाव पोलिसांची कारवाई

Web Title: Chhatrapati sambhajinagar bunty dixit murder case country made pistol recovered sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Murder Case

संबंधित बातम्या

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
1

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
2

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी
3

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

Sillod Police Raid : सिल्लोड येथे पोलिसांच्या कारवाईत कल्याण मटका जुगार रॅकेटचा पर्दाफाश, बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त
4

Sillod Police Raid : सिल्लोड येथे पोलिसांच्या कारवाईत कल्याण मटका जुगार रॅकेटचा पर्दाफाश, बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.