
Police take action against truck carrying animals for slaughter in Nanded, five animals rescued
७ डिसेंबर रोजी रात्री उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाकडून नांदेड शहर आणि जिल्ह्यात गस्त घालत असताना, बोंडार हवेली परिसरात गुप्त माहितीदारामार्फत पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली. जिल्ह्यात अवैध मार्गाने गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करीत पाच गोवंशीय जनावरे आणि वाहने असा एकूण १.२५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
हे देखील वाचा : भास्कर जाधव ठरले ‘ऑपरेशन टायगर’चे शिकार? विरोधी पक्षनेते न मिळताच घेतली शिंदेंच्या नेत्याची हॉटेलमध्ये भेट
७ डिसेंबर रोजी रात्री उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाकडून नांदेड शहर आणि जिल्ह्यात गस्त घालत असताना, बोडार हवेली परिसरात गुप्त माहितीदारामार्फत पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली. नांदेड, नांदेड शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच ट्रिपल सीट भरधाव वेगाने जाणाऱ्या युवकांची पोलीस दखल घेत नसल्यामुळे सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने अखेर कारवाई केली आहे.
हे देखील वाचा : मुलाखतींच्या तारखांबाबत इच्छुकांमध्ये झाला संभ्रम; भाजपामधील अंतर्गत वाद आला समोर
गौवंश कत्तलीसाठी अवैधरीत्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच ०२ एफ जी ०९७८) आलुपेंज मार्केटकडून गाडेगाव रोडकडे येणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ सापळा रचण्यात आला. सुमारे सकाळी ६ वाजता, पोलिसांनी आलुपैज मार्केटजवळ छापा टाकून ही बोलेरो पिकअप ताब्यात घेतली. तपासणीअंती वाहनात अवैधरीत्या कोंबून भरलेली पाच गोवंशीय जनावरे आढळून आली. जप्त केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे ३ लाख २५ हजार २०० रुपये, तर बोलेरो पिकअपची किंमत अंदाजे ६ लाख रुपये, असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीसह जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे नदिड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला.