
संक्रांतीपूर्वी पोलिसांची धडक कारवाई! (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या घंटागाडी मार्फत नायलॉन मांजा वापरू नका, अशी जनजागृती सुरू आहे. @commr_csmc @CSMC802765Cor pic.twitter.com/trPuRO0UKr — Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) December 11, 2025
तालुकानिहाय कारवाईचा तपशील
| तालुका/पोलीस ठाणे | गुन्हे दाखल | आरोपींची नावे (उदाहरणे) | जप्त केलेला मुद्देमाल (किंमत) |
| वैजापूर | २ | गौरव रामदास दिलवाले, फारुख मोहम्मद शेख | ₹१,६०० + ₹२,६०० (एकूण ₹४,२००) |
| कन्नड | १ | शेख नासिर शेख खबीर | ₹७,६४० |
| सिल्लोड | १ | शेख मलीक शेख खालीक | ₹१,००० |
| करमाड | २ | प्रकाश बबनराव वांगले, अहमद महेबुब पठाण | ₹८०० + ₹३,१०० (एकूण ₹३,९००) |
| एकूण | ६ गुन्हे | – | ₹१६,७४० |
१. वैजापूर
गौरव रामदास दिलवाले (२१, रा. रामवाडी) याला प्रतिबंधित मांजा विक्रीसाठी बाळगताना पकडले. तसेच, फारुख मोहम्मद शेख (रा. दर्गा बेस) याच्याकडूनही मांजा हस्तगत करण्यात आला.
२. कन्नड
कन्नड शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या शेख नासिर शेख खबीर (५६, रा. शिवनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ९ प्लास्टिक चक्री आणि १०४ पुक्वा असा ₹७,६४० किमतीचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
३. सिल्लोड
सिल्लोड शहरात एका पतंग दुकानावर छापा मारून शेख मलीक शेख खालीक (३२, रा. बायपास रोड) याला मांजा विक्री करताना पकडण्यात आले.
४. करमाड
करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाश बबनराव वांगले आणि अहमद महेबुब पठाण या दोघांना स्वतंत्र कारवाईत नायलॉन मांजा विकताना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
हे देखील वाचा: लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर…