सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’! (Photo Credit - AI)
डोक्यावर हात ठेवून ‘लिंबू कापला’
घटनेबाबत फिर्यादी ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. फिर्यादीची पत्नी मागील चार-पाच महिन्यांपासून सुराणानगर येथील रूपाली अमोल भाटिया यांच्या घरी स्वयंपाक आणि धुणीभांडी करण्याचे काम करत होती. तब्येत बिघडल्याने तिने ५ नोव्हेंबरपासून काम सोडले होते. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीनिवास अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला.
घटनेचा क्रम
१५ नोव्हेंबर रोजी रूपाली भाटिया यांनी फिर्यादीच्या पत्नीला फोन करून घरी बोलावले. त्यानंतर रूपालीने घरातून लिंबू आणला. रूपालीची सासू सविता भाटिया हिने पीडितेच्या डोक्यावर हात ठेवून तंत्रमंत्राचे उच्चार करत लिंबू कापला. “या प्रकाराचा फोटो महाराजाला पाठवतो. महाराज ज्याचे नाव सांगतील, त्याच्याविरोधात सोने चोरीचा गुन्हा दाखल करणार,” असेही सांगण्यात आले.
हे देखील वाचा: लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर…
पीडितेची प्रकृती बिघडली
या अघोरी प्रकारामुळे आणि खोट्या आरोपांच्या भीतीपोटी पीडित महिला मानसिकरीत्या खचल्या. सायंकाळी घरी गेल्यावर त्यांनी पतीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करावे लागले.
सासू-सुनेविरोधात गुन्हा दाखल
घटनेनंतर फिर्यादीने जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, रुपाली अमोल भाटिया आणि तिची सासू सविता भाटिया (दोघी रा. श्रीनिवास अपार्टमेंट, सुरणानगर) या दोघींविरोधात खालील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा (जादूटोणा विरोधी कायदा) पुढील तपास सहायक आयुक्त मनोज पगारे करीत आहेत.






