Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलवारीने केक कापणे पडलं महागात; बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

हडपसरमधील एका अल्पवयीन बड्डे बॉयला तलवारीने केक कापणे चांगलेच अंगलट आले असून, त्याच्यासह इतर मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 12:46 PM
तलवारीने केक कापणे पडलं महागात; बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

तलवारीने केक कापणे पडलं महागात; बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

Follow Us
Follow Us:
  • तलवारीने केक कापणे पडलं महागात
  • बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
  • वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : हडपसरमधील एका अल्पवयीन बड्डे बॉयला तलवारीने केक कापणे चांगलेच अंगलट आले असून, त्याच्यासह इतर मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसर येथील शेवकर वस्‍ती भागात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पोलिस अमंलदार अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

 

पुणे पोलिसांनी हत्‍यारांचा वापर करून रस्‍त्‍यावरच केक कापत दहशत पसरविण्याचे गुन्‍हेगारी कृत्‍य करू नये, अशा वारंवार सुचाना दिल्‍या आहेत. दरम्यान, एका इन्स्‍ट्राग्राम अकाउंटवर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओत धारदार तलवारीनी केक कापून नंतर तलवार हवेत नाचवून दहशत पसरविल्‍याचे निदर्शनास आले.

दरम्‍यान हा वाढदिवस हडपसर येथील शेवकर वस्‍ती, लक्ष्मीनगर येथील यल्‍लाम्‍मा मंदिराजवळ रस्‍त्‍यावर साजरा केल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार, तेथील नागरिकांकडे विचारपूस केली असता दिनांक १७ फेब्रुवारी रात्री नऊच्या सुमारास वाढदिवस साजरा केला. धारदार तलवारीने केक कापून नंतर त्‍याने व त्‍याच्‍या साथीदारांनी दहशत पसरविल्‍याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्‍या आदेशाचा भंग केल्‍याप्रकरणी बड्डे बॉय आणि त्‍याच्‍या साथीदारांवर हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

स्वारगेट येथील महर्षीनगरमध्ये सोसायटीच्या अवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुलेट चालकासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, बुलेट चालकासह साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे महर्षीनगर भागातील सोसायटीत राहायला आहेत. आरोपी बुलेट चालक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आला. त्याने जोरात बुलेटचा हॉर्न वाजविला. बुलेटचा कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रासलेल्या ज्येष्ठाने विचारणा केल्यानंतर बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. नंतर बुलेट चालक आणि साथीदार सोसायटीच्या आवारात आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्क्या, तसेच बॅटने मारहाण केली. सहायक निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

Web Title: Police take major action against birthday boy for cutting cake with sword

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Birthday
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
1

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
2

केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
3

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ
4

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.