सासऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तब्बल १३४ कोटींचे शेअर्स हडपल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी रायपूर येथील व्यावसायिक कुटुंबातील ८ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लकडगंज येथे राहणाऱ्या सोनल मनोज अग्रवाल (४५) यांनी ही तक्रार दाखल केली. आरोपींमध्ये रवी रत्तनकुमार अग्रवाल, प्रीती रवी अग्रवाल, शकुंतला रतनकुमार अग्रवाल, गोपाळ अग्रवाल, मुस्कान गुप्ता, अशोक ऋषिकेश अग्रवाल, सुभाषचंद्र मंगतराम मित्तल आणि गेंडालाल पंचमलाल शाहू (सर्व रा. रायपूर) यांचा समावेश आहे.
सोनलच्या तक्रारीनुसार, तिचे सासरे सज्जनकुमार अग्रवाल आणि त्यांचा धाकटा भाऊ रतनकुमार अग्रवाल यांनी ओडिशा बंगाल करिअर्स लिमिटेड कंपनी सुरू केली. कंपनीचे प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे होते. २०१८ मध्ये ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत झाली आणि सोनलचे पती मनोज अग्रवाल यांच्याकडे सुमारे ५.२२ लाख शेअर्स होते. मनोजच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रतनकुमार आणि त्यांचा मुलगा रवी यांनी कंपनीचा ताबा घेतला. रवी आणि त्याची पत्नी प्रीती यांनी स्वतःला व्यवस्थापकीय संचालक व अतिरिक्त संचालक म्हणून नेमले. त्यानंतर त्यांनी बनावट सह्या करून कंपनीचे सर्व शेअर्स आपल्या नावावर हस्तांतरित केले. २०२४ मध्ये मनोज आजारी पडल्यावर सोनलने त्याच्या उपचारासाठी कंपनीकडून मदत मागितली असता, कंपनीत मनोजचा काहीच हिस्सा नसल्याचे रवीने सांगितले. ३१.२७ कोटींचे शेअर्स आणि १३ कोटी रोकड हडपल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांकडून तपास सुरू आहे.
निफ्टी उच्चांकावरून १२० अंकांनी घसरला, बाजार दबावाखाली
२५,९०० चा प्रतिकार टप्पा ओलांडल्यानंतर, निर्देशांक आता आणखी वर जात आहे. निफ्टी निर्देशांक २५,९०० वर अजूनही काही प्रतिकार करत आहे. सेन्सेक्स निर्देशांक देखील जवळजवळ १०० अंकांनी घसरून ८४,४०० च्या खाली आला आहे.
अस्थिरतेच्या दरम्यान, एशियन पेंट्सचे शेअर्स कालच्या व्यवहारापासूनच व्यवहार करत आहेत, आजच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये ४% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
निफ्टी २५,९०० – २६,००० बँडमध्ये काही प्रतिकार दाखवत आहे आणि बुधवारचा २५,९३३ चा उच्चांक हा चढउतार पाहण्यासाठी पहिला महत्त्वाचा स्तर असेल.
या हंगामातील शेवटच्या मोठ्या कमाईच्या दिवशी, आयशर, हिरो, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, एनएसडीएल, व्होल्टास, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट इत्यादी कंपन्या निकाल जाहीर करतील. टाटा स्टील, कोचीन शिपयार्ड, डेटा पॅटर्न, अफकॉन्स इन्फ्रा, केएनआर कन्स्ट्रक्शन्स, पीएनसी इन्फ्राटेक इत्यादी कंपन्यांकडून मिळकतीच्या प्रतिक्रिया देखील पाहिल्या जातील.
Ans: सोनल अग्रवाल
Ans: लकडगंज
Ans: आठ






