crime (फोटो सौजन्य: social media)
भंडारा जिल्ह्यातून एक संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका ॲकॅडमीच्या प्रशिक्षकानं त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली. एवढंच नाही तर त्यानं तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्याच्या अड्याळ इथं घडलाय.
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये तुफान राडा; 25 ते 30 जणांच्या जमावाचा दोघांवर प्राणघातक हल्ला
याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी तरुणीच्या मित्राच्या तक्रारीवरून ॲकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध 75 (2), 351, 352(2) सहकलम 3(1) (आर )(एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. नितेश हिवरकर (39) रा. सोनेगाव ठाणे ता. पवनी जि भंडारा असं अटक करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे. नितेश हिवरकर याची स्वतःचीच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी आहे आणि तो तिथेच प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. एक १६ वर्षाच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपला आयुष्य संपवलं आहे. त्यांना एका क्षुल्लक कारणावरून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. शहारा जवळील खवड्या डोंगरावरून १६ वर्षीय तरुणाने उडी मारल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आईने मोबाईल का दिला नाही ? या कारणाने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
नेमकं काय घडलं?
एका १६ वर्षीय मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं आहे. “आईने मोबाईल का दिला नाही?” या क्षुल्लक कारणावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शराजवळील खवड्या डोंगरावर ही घटना घडली आहे. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपला आई- वडिलांसोबत वाळूज परिसरात राहत होता. तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्यांने आपल्या आई- वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने “सध्या मोबाईल घेऊ नको” असं स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला. आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवड्या डोंगरावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरु आहे.
चोरट्यांची पण कमालच! पोलीस चौकीजवळच 9 दुकाने फोडली; तब्बल लाखोंचा ऐवज चोरला