Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police : हुक्का पार्लरकडून प्रोटेक्शन मनी घेणाऱ्या पोलिसाचे निलंबन

पोलीस उपनिरीक्षकाने हुक्का पार्लरला परवानगी देऊन त्याच्याकडून प्रोटेक्शन मनी घेतल्याचा प्रकार समोर आला असून, आयुक्तांनी या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2025 | 01:09 PM
हुक्का पार्लरकडून प्रोटेक्शन मनी घेणाऱ्या पोलिसाचे निलंबन

हुक्का पार्लरकडून प्रोटेक्शन मनी घेणाऱ्या पोलिसाचे निलंबन

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील अवैध धंद्याविरोधात वारंवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार कठोर भूमिका घेत आहेत. विशेष करून हुक्काबार तसेच पब याबाबत विशेष लक्ष दिले जात असतानाच पोलीस उपनिरीक्षकाने हुक्का पार्लरला परवानगी देऊन त्याच्याकडून प्रोटेक्शन मनी घेतल्याचा प्रकार समोर आला असून, आयुक्तांनी या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. त्यासोबतच अशा अवैध धंद्यांना सरंक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली केल्यास तुमची खैर नाही, असेही सूचित केले आहे.

शरद निवृत्ती नवले असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. मंहमदवाडी येथील बीबीसी रुफटॉप किचन अँड बारयेथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. येथे १६ टेबलांवर ५७ तरुण-तरुणी हुक्का पित असल्याचे आढळून आले होते. हुक्का पार्लरवरील ही पुण्यात सर्वात मोठी कारवाई होती. हॉटेलचा मालक पार्थ अनिल वाल्हेकरने त्याच्याकडील चौकशीत एप्रिल २०२५ मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली. त्याबाबत श्रेणी उपनिरीक्षक शरद नवले याच्याशी बोलणे झाले होते. त्याने हुक्का बार सुरु केल्याबद्दल गुडलकचे ३० हजार व एप्रिल महिन्यांचे ३० हजार रुपये असे ६० हजार रुपये १० एप्रिल २०२५ रोजी रोख स्वीकारले असल्याची माहिती दिली.

एका त्रयस्त व्यक्तीमार्फत ऑनलाईन ३० हजार रुपये दिले. शरद नवले यांनी हॉटेल मालकास बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून ९० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने शरद नवले यांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले.

आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित

ट्रकचालकासोबत वाटमारी करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबीत केले आहे. बापुराव पोपट ढोले असे त्याचे नाव आहे. ट्रक चालवित असताना, मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप करून, त्याने चालकाला 15 हजार रुपये दंडाची भिती दाखवली. त्यानंतर दहा हजार रुपये त्याच्याकडून घेतले होते. ढोले याची खाबुगिरी चव्हाट्यावर आल्यानंतर त्याला चांगलाच दणका देण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर संबंधीत ट्रकचालकाने पुणे ग्रामिणच्या राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक ग्रामिण यांनी याबबातचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला होता. त्यानुसार ढोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 15 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता.

Web Title: Policeman suspended for taking extortion from hookah parlor in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.