Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 11:26 AM
Crime News, Robbery Case, Alephata News,

Crime News, Robbery Case, Alephata News,

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना भटकळवाडी, पिंपळवंडी येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दीपज्योती विशाल सैद (वय ४०, रा. भटकळवाडी, पिंपळवंडी) या कुकडी व्हॅली शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी त्या घराबाहेर असताना शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घरी धाव घेतली. घराजवळ पोहोचल्यावर दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल !

दरम्यान, घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरट्यांनी सोन्याची कर्णफुले, बांगड्या, लक्ष्मी हार, अंगठी, मंगळसूत्र, चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, चार हातातील कड्या, चांदीचा छल्ला, कंबरपट्टा/साखळी, दोन चांदीची नाणी तसेच डीव्हीआर उपकरण असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश टिटमे पुढील तपास करत आहेत.

महिला खेळाडूविरोधात गुन्हा दाखल

दुसऱ्या एका घटनेत, जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटर फरखंदा खान (वय 30), तिचा भाऊ बाजिल खान (वय 27) आणि साथीदार उद्दीन इम्तियाज वानी (वय 22) यांच्याविरोधात सेक्सटॉर्शन आणि कोलाबातील एका व्यापाराकडून 23.61 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 1500 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तीन्ही आरोपींनी व्यापाराचे प्रायव्हेट चॅट्स पब्लिक करण्याचे आणि त्याच्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती.

Web Title: Burglary in pimpalvandi valuables worth 3 25 lakh stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Aalephata News
  • crime news
  • Robbery case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.