Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी कारागृहात, आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चा! रिलस्टार प्रतीक शिंदे जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आलिशान गाड्यांचा ताफा, घोडे आणि धोकादायक स्टंटबाजी... आळंदीतील या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं आणि आता पोलिस काय भूमिका घेणार?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 09, 2026 | 12:47 PM
जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • आळंदीतील निर्माणाधीन रिंग रोडवर स्टंटबाजी केल्याचा आरोप.
  • आलिशान गाड्या आणि घोड्यांचा वापर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • प्रतीक शिंदे नुकताच जामिनावर बाहेर; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष.
पिंपरी-चिंचवड : सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या रिलस्टार प्रतीक शिंदे याच्याशी संबंधित आणखी एका प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. जामिनावर कारागृहाबाहेर आल्यानंतर आलिशान गाड्या आणि घोड्यांचा वापर करून धोकादायक स्टंटबाजी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण रोडवरील हनुमानवाडी परिसरात, रिंग रोडच्या निर्माणाधीन जागेवर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या स्टंटबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चा रंगली आहे.

आलिशान गाड्या आणि घोड्यांचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक शिंदे आणि आळंदी येथील त्याचा सहकारी ह.भ.प. महेश महाराज मडके यांनी आलिशान गाड्यांच्या ताफ्यासह घोड्यांचा वापर करून स्टंट केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियासाठी चित्रीकरण करताना सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे स्टंटबाजी केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारात घोड्यांचा वापर करण्यात आल्याने प्राणीप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्राण्यांचा वापर करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या घटनेत प्राण्यांना इजा झाली का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा: अडीच कोटींची थकबाकी अन् कर्जाचा डोंगर! कंत्राटदाराच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?

अपहरण आणि मारहाण प्रकरणामुळे चर्चेत

प्रतीक शिंदे याचे नाव यापूर्वीही एका गंभीर प्रकरणात समोर आले होते. चिनी बेटिंग अॅप्सच्या विरोधात व्हिडिओ बनवणाऱ्या २८ वर्षीय कंटेंट क्रिएटर चेतन देवलकर याचे अपहरण करून मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रतीक शिंदेसह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात बेटिंग अॅप्सच्या प्रचारावरून वाद झाल्याचा आरोप आहे.  या प्रकरणात अटक झाल्यानंतर प्रतीक जामिनावर बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता स्टंटबाजीच्या व्हिडिओमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, या नव्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे का, तसेच कोणती कारवाई करण्यात आली आहे, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंटबाजी केल्याचे आरोप खरे असल्यास, संबंधित प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे. वाहनांचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला का, घोड्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली का आणि संबंधित नियमांचे उल्लंघन झाले का, याची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी धोकादायक प्रकारांचे चित्रीकरण करण्याच्या प्रवृत्तीवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रतीक शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कथित स्टंटबाजीप्रकरणी आळंदी पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Pratik shinde reelstar dangerous stunts viral video alandi sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Influencers
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
1

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक
2

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक

KSRTC Bus Viral Video : बर्गमन स्कूटी थांबवली, बससमोर दिल्या घोषणा; कर्नाटकातील घटनेने खळबळ
3

KSRTC Bus Viral Video : बर्गमन स्कूटी थांबवली, बससमोर दिल्या घोषणा; कर्नाटकातील घटनेने खळबळ

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
4

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.