सौजन्य फोटो - सोशल मिडाया
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील ‘रनवाल टॉवर’ या ३२ मजली उंच इमारतीत ही आगीची घटना घडली. या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटला अचानक आग लागली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला याबाबतचा कॉल मिळाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १ फायर इंजिन, १ वॉटर टँकर, १ रेस्क्यू व्हॅन आणि १ जंबो टँकर तैनात करण्यात आला होता, तसेच सुरक्षेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी पाठवण्यात आली. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दुसरीकडे, गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम परिसरातही एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. रॉयल पाम वसाहतीच्या मालकाच्या घराखालील मजल्यावर ही आग भडकली. प्राथमिक अंदाजानुसार, फटाक्यांमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या इमारतीत फायर सिस्टीम आणि अग्निशमन दलाची एनओसी (NOC) नसल्याची माहितीही पुढे आली आहे. या अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि सर्वांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
Ans: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील ३२ मजली 'रनवाल टॉवर' या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागली.
Ans: गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम परिसरात फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ans: माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर, रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली






