काय घडल नेमकं?
शिवाजी शिळीमकर हे आपल्या नात तन्वीसह दुचाकीवरून आंबेगावहून मूळ गाव तांभाडकडे निघाले होते. हातवे–तांभाड मार्गावरील देऊळवाडीजवळ ते पोहोचले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एमएच 14/ एचयू 3777) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी आजोबा आणि नातीला नसरापूर येथील खाजगी रुग्णलयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविचंदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने (रा. उबाळेनगर, वाघोली, ता. हवेली) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.
“तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे…” आईला फोन; प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाणीत हत्या
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागेश संजय जाधव (वय २३, रा. शिवाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी नागेच्या आईला धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह अनेक जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हातवे–तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ हा अपघात झाला.
Ans: शिवाजी नामदेव शिळीमकर (69) आणि त्यांची 9 वर्षांची नात तन्वी नितीन शिळीमकर यांचा मृत्यू झाला.
Ans: पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.






