संग्रहित फोटो
पूनम सोलंकी हिने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा आणि दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला होता. ही धक्कादायक घटना ५ जानेवारी २०२२ रोजी मुळशी तालुक्यातील शिरवली शिवारात घडली होती. याप्रकरणी तिचे पती संजय सोलंकी यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सोलंकी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले होते. ते शिरवली परिसरात बांधकाम कामगारांसाठी असलेल्या छोट्या घरात राहत होते. पूनम मुलांना वारंवार मारहाण करत असल्याचे तपासात समोर आले होते. मुलांना मारू नको, असे समजावून सांगितल्यास ती चिडचिड करत असे.
लोणावळ्यात भावाकडे जाताना मुलांचा खून
५ जानेवारी रोजी पूनम दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडली. बराच वेळ मुले आणि पत्नी घरी न परतल्याने पती संजय यांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, पूनमने दोन्ही मुलांना जंगलात नेले आणि दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर ती मुलांना तिथेच सोडून लोणावळ्यात राहणाऱ्या भावाकडे गेली. दुसऱ्या दिवशी पूनमच्या भावाने संजय यांना फोन करून ती मुलांशिवाय लोणावळ्यात आल्याची माहिती दिली. मुलांबाबत विचारणा केली असता, पूनमने दोन्ही मुलांना मारून गवतात टाकल्याचे सांगितले.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विजय फरगडे आणि अनिलकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे पूनमला मुलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. अखेर तिला दुहेरी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली.
Ans: पुणे सत्र न्यायालयाने पूनम सोलंकी हिला दुहेरी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Ans: ही घटना ५ जानेवारी २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शिरवली शिवारात घडली होती.
Ans: पूनम सोलंकी हिने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा आणि दोन वर्षांच्या मुलाचा जंगलात दोरीने गळा आवळून खून केला होता.






