रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार
या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र (Automated Testing Station – ATS), स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (Automated Driving Testing Track – ADTT) तसेच प्रस्तावित रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या कामांचा आढावा घेतला.
मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन
सासवड येथील २५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे वाहनांची तांत्रिक तपासणी आणि चालकांची चाचणी अधिक पारदर्शक, अचूक व वैज्ञानिक पद्धतीने होणार आहे. स्वयंचलित चाचणी केंद्रात सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे ब्रेक, सस्पेन्शन, दिवे आणि उत्सर्जन यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होऊन रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.
स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गावर ८ आकाराचा मार्ग, एच आकाराचा मार्ग, चढ-उतार आणि वळणांचे ट्रॅक अशा विविध चाचण्यांद्वारे चालकांच्या कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या साहाय्याने या चाचण्या घेतल्या जाणार असल्याने चालकांना परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह होईल.
राज्य रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बदलते मोटार वाहन कायदे, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच रस्ता सुरक्षा विषयक कामकाज अधिक प्रभावी होईल.
“रस्ते अपघात कमी करण्यासाठी केवळ नियमांची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सासवड येथील हे केंद्र देशासाठी आदर्श ठरेल, अशा दर्जाने उभारले पाहिजे,” असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले. या केंद्रामुळे वाहनांची सुरक्षितता, चालकांचे कौशल्य आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राच्या रस्ता सुरक्षा क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
Ans: देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील सासवड येथे उभारण्यात येणार आहे.
Ans: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.
Ans: रस्ते सुरक्षेसंदर्भातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देणे तसेच रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करणे हा या केंद्राचा उद्देश आहे.






