
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४), नेहा पांडुरंग शिंदे (२०, दोघीही रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावं आहेत. या दोघी संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी दुचाकीवरून जात होत्या. त्या आपली गाडी आपल्या लाईनमध्ये चालवत होत्या. त्यांचा स्पिड ही जास्त नव्हता. त्याच वेळी त्यांच्या मागून एक आयशर ट्रक आला. त्यांना काही कळण्याच्या आत या भरधाव ट्रकने त्यांना मागून जोरदार धडक दिली. ही धडक एव्हढी जोरदार होती की दोघी गाडीवरून उडाल्या आणि थेट खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक नागपूर उलथून वाटाणा घेऊन पुणे येथे आला होता. ती पोती उतरवून परतत असताना ही घटना घडली. पोलिसांनी जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे.
शिंदे दाम्पत्याचा आधार हरपला
अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही बहिणी घराचा आधार होत्या, ऋतुजा वकील होती. ताथवडेतून तिने कायद्याचे शिक्षण घेतलेलं होतं. नेहा कॉलेजची विद्यार्थिनी होती. त्यांचे वडील पांडुरंग शिंदे यांचा मिरची कांडपचा व्यवसाय आहे. आई कमल गृहिणी आहे. शिंदे दाम्पत्याला दोन मुली होत्या. दोघी आपल्या आई-वडिलांचा आधार होत्या, मात्र, दोघींच्या मृत्यूने शिंदे दाम्पत्याचा आधार गेला. ऐन सणाच्या दिवशी झालेल्या या घटनेने पुनावळे परिसरावर शोककळा पसरली होती. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
Ans: काळेवाडीतील रहाटणी फाटा, बीआरटी मार्गावर.
Ans: दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
Ans: ऋतुजा पांडुरंग शिंदे (वकील) आणि नेहा पांडुरंग शिंदे (विद्यार्थिनी).