Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: आधी गाडीची धडक अन् मग डोक्यात दगड! संपत्तीच्या वादातून दीरच बनला सैतान; शिक्षिका भावजयचा खून

Pune Crime News: संपत्तीच्या वादातून शिक्षिका भावजयचा थरारक घात! बस स्टॅन्डकडे पायी जाणाऱ्या उज्वला काकडे यांना आधी गाडीने धडक अन् मग डोक्यात दगड घालून संपवलं; लेकीच्या वाढदिवशीच घडलेल्या दुर्दैवी घटनेने पुरंदर हादरलं!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 04:57 PM
Pune Crime News: आधी गाडीची धडक अन् मग डोक्यात दगड! संपत्तीच्या वादातून दीरच बनला सैतान; शिक्षिका भावजयचा खून

Pune Crime News: आधी गाडीची धडक अन् मग डोक्यात दगड! संपत्तीच्या वादातून दीरच बनला सैतान; शिक्षिका भावजयचा खून

Follow Us
Follow Us:
  • शिक्षिका उज्वला काकडे यांना दिराने गाडीने धडक देऊन डोक्यात घातले दगड
  • पैसे व जागेच्या वादातून मुलीच्या वाढदिवशीच आईचा मृत्यू
  • पळून जाणाऱ्या आरोपी दिराला पोलिसांनी काही तासांत पकडले
Pune Crime News: पैसा आणि जमिनीच्या कारणावरून पुरंदर तालुक्यात कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन थेट रक्ताचे पाट सांडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच एका अमानुष घटनेत संपत्तीच्या वादातून दिरानेच शिक्षिका असलेल्या सख्ख्या भावजयचा निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पायी बस स्टॅन्डकडे जात असताना आधी चारचाकी गाडीने धडक देऊन आणि नंतर डोक्यात दगड व मानेवर लोखंडी वस्तूने वार करत हा घातपात करण्यात आला. मात्र, सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने सूत्रे हलवत आरोपीला काही तासांतच जेरबंद केले.

हेही वाचा: Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड…

पैसे आणि गुंठ्याच्या वादातून सुरू होते खटके

(वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) असे खून झालेल्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. त्या हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आणि पांगारे येथून दररोज ये-जा करत असत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीचे आजाराने निधन झाले होते. पतीच्या खात्यावर ८ ते १० लाख रुपयांची रक्कम आणि सासवडमध्ये एक गुंठा क्षेत्र होते. यातील निम्मा हिस्सा आपल्याला मिळावा, यासाठी दीर शशिकांत माणिकराव काकडे आणि सासू सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांनी तगादा लावला होता. यास उज्वला काकडे यांचा विरोध असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. याप्रकरणी गणेश दत्तात्रय मेमाणे (वय ३९, रा. श्रीलक्ष्मी इन्क्रेव्ह सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गाडीची धडक, दगडाचा प्रहार अन् जागेवरच मृत्यू

गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे पांगारे येथून हडपसरकडे जाण्यासाठी पायी बस स्टॅन्डकडे निघाल्या होत्या. याच दरम्यान दीर शशिकांत काकडे याने कॅरी गाडीने येऊन त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि विव्हळत खाली पडल्या. त्यानंतर आरोपीने गाडीतून उतरून जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला तसेच गाडीतील लोखंडी वस्तूने मानेवर प्रहार केले. प्रचंड जखमा आणि तीव्र रक्तस्त्रावामुळे उज्वला काकडे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांची तात्काळ कारवाई; आरोपी ताब्यात

घटनेनंतर आरोपी शशिकांत काकडे याने त्याच गाडीने पळ काढला आणि सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात गाडी सोडून डोंगराळ भागातून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या सूचनेनुसार सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवून काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी दीर शशिकांत काकडे आणि सासू सुलोचना काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:Women Exploitation: कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळाला, १४ महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीचा यूएईमधून ताबा!

मुलीच्या वाढदिवशीच आईचा अंत

पतीच्या निधनानंतर उज्वला काकडे या आपल्या १२ ते १३ वर्षांच्या एकुलत्या मुलीसह पांगारे येथे राहत होत्या. मुलीचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, त्याच दिवशी संपत्तीच्या वादातून आईचा जीव गेल्याने आणि वडिलांनंतर आईचेही छत्र हरवल्याने या लहान मुलीवर पोरकेपणाचे दुःख कोसळले आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुरंदरच्या पांगारे येथे कोणाची हत्या झाली?

    Ans: हडपसर येथील साधना विद्यालयातील शिक्षिका उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) यांची संपत्तीच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली.

  • Que: या हत्याकांडात कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: मयत शिक्षिकेचा दीर शशिकांत माणिकराव काकडे आणि सासू सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी दिराला काही तासांतच ताब्यात घेतले आहे.

  • Que: ही घटना नेमकी कशी आणि कोणत्या कारणातून घडली?

    Ans: पतीच्या निधनानंतर खात्यातील ८-१० लाख रुपये आणि सासवडमधील एक गुंठा जागेतील अर्ध्या हिस्स्याच्या वादातून १९ नोव्हेंबर रोजी बस स्टॅन्डकडे पायी जाणाऱ्या उज्वला काकडे यांना कॅरी गाडीने धडक देऊन डोक्यात दगड व मानेवर लोखंडी वस्तूने प्रहार करत ठार मारण्यात आले.

Web Title: Pune crime murder brother in law property dispute saswad police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • murder case news
  • property
  • pune crime case

संबंधित बातम्या

Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात…
1

Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात…

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!
2

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!
3

Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
4

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.