Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: जेवण बाहेरून मागवलं म्हणून पतीचा संताप; पत्नीवर कात्रीने वार, पुण्यात धक्कादायक घटना

जेवण बाहेरून मागवलं म्हणून सुरू झालेला किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की, पतीने संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील कात्री उचलली. दारूच्या नशेत त्याने पत्नीवर वार केल्याने तिचा दंड जखमी झाला. अखेर जखमी पत्नीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर आंबेगाव बुद्रुकमधील धक्कादायक प्रकार समोर आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 07, 2026 | 02:19 PM
Crime News: जेवण बाहेरून मागवलं म्हणून पतीचा संताप; पत्नीवर कात्रीने वार, पुण्यात धक्कादायक घटना

Crime News: जेवण बाहेरून मागवलं म्हणून पतीचा संताप; पत्नीवर कात्रीने वार, पुण्यात धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • जेवण बाहेरून मागवल्याने पतीचा संताप; दारूच्या नशेत पत्नीवर कात्रीने वार
  • आंबेगाव बुद्रुकमध्ये वादाला हिंसक वळण; पत्नीच्या दंडावर कात्रीचा वार
  • जखमी पत्नीची पोलिसांत धाव; शुभम शेजवळविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पती-पत्नीच्या नात्यात लहान-मोठे वाद होत असतात. मात्र, काही वेळा क्षुल्लक कारणांवरून सुरू झालेला वाद टोकाला जाऊन हिंसक रूप धारण करतो. असाच धक्कादायक प्रकार पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात समोर आला आहे. पत्नीने घरी जेवण न बनवता बाहेरून जेवण ऑर्डर केल्याचे पाहून पतीला राग आला. त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच वाद वाढला आणि रागाच्या भरात पतीने घरातील धारदार कात्री उचलून पत्नीवर वार केल्याचा आरोप आहे.

दारूच्या नशेत घरी आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम अशोक शेजवळ (वय २८, रा. सिद्धिविनायक कॉलनी, दत्तनगर चौक, आंबेगाव बुद्रुक) हा सोमवारी दुपारी दारूच्या नशेत घरी आला होता. त्यावेळी पत्नीने घरी जेवण तयार न करता बाहेरून जेवण मागवल्याचे त्याला समजले. यावरून शुभम संतापला आणि त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू होता; मात्र काही वेळात परिस्थिती चिघळली.

हेही वाचा: परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?

स्वयंपाकघरातील कात्री उचलली

वाद विकोपाला गेल्यानंतर शुभमने स्वयंपाकघरातील कात्री हातात घेतली. त्यानंतर त्याने पत्नीवर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये कात्रीचा वार पत्नीच्या दंडावर झाल्याने ती जखमी झाली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पत्नी घाबरली. पतीचा आक्रमकपणा वाढत असल्याने तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तेथून बाहेर पडत पोलिसांशी संपर्क साधला.

जखमी पत्नीने पोलिसांत धाव घेतली

घटनेनंतर जखमी २६ वर्षीय पत्नीने आंबेगाव पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम शेजवळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीला झालेल्या दुखापतीबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. जेवण बाहेरून मागवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट कात्रीने हल्ला करण्यापर्यंत गेल्याने या घटनेची परिसरात चर्चा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत. तक्रारीतील आरोप, घटनेची पार्श्वभूमी आणि त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

Web Title: Pune ambegaon husband attacks wife with scissors over food order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Attack
  • Domestic Violence
  • Husband and wife
  • pune crime news

संबंधित बातम्या

विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ
1

विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ

Pune Crime: बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार; अल्पवयीनाच्या हातातील पिस्तुलातून सुटली गोळी, तरुणाच्या पार्श्वभागात घुसली
2

Pune Crime: बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार; अल्पवयीनाच्या हातातील पिस्तुलातून सुटली गोळी, तरुणाच्या पार्श्वभागात घुसली

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई
3

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली
4

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.