Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

पुण्याच्या कोथरूड भागात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला. शाळेतील जुन्या वादातून दोन तरुणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केला. मुलगा गंभीर जखमी असून आरोपी पसार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 09:10 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्याच्या कोथरूड भागात दहावीतील अल्पवयीन मुलावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला
  • शाळेतील जुन्या वादातून दोन तरुणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले
  • आरोपी पसार; कोथरूड पोलिसांकडून शोधमोहीम आणि तपास सुरू
पुणे: पुणे येथील कोथरुद्ध परिसरात एक धक्कदायक घटना घडली. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार भर रस्त्यात घडला. या घटनेमुळे स्थानिक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना १७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.

Banglore News: DGP रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ मॉर्फ असल्याचा केला दावा; राजकारणात मोठी खळबळ

काय घडलं नेमकं?

संबंधित मुलाच्या शाळेत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून दोन तरुणांनी त्याला लक्ष केले. १७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जेव्हा तो मुलगा कोथरूड भागातून जात होता. तेव्हा त्याला रस्त्यात अडवले. स्वामी समर्थ मठाजवळ गाठून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

का करण्यात आला हल्ला?

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या भांडणामुळे हा रक्तरंजित हल्ला झाला असून आरोपी सध्या पसार झाले आहेत.

आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी बलराम हनुमंत लोखंडे (वय 24) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहेत. पोलीस लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Crime News : तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी…; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

या घटनेप्रकरणी एका तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी समीर हाश्मी हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र तरुणीने त्याच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिल्यानंतर आरोपी चिडला आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

घटनेच्या दिवशी आरोपी थेट तरुणीच्या घरात शिरला. “तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही,” अशी धमकी देत त्याने तरुणीला दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने त्याला घराबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी अधिकच संतप्त झाला. त्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी समीर हाश्मी याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: कोथरूड परिसरात, 17 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास.

  • Que: हल्ल्याचं कारण काय होतं?

    Ans: शाळेत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला.

  • Que: आरोपींची स्थिती काय आहे?

    Ans: दोन्ही आरोपी सध्या पसार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: Pune crime a 10th grade student attacked with a machete in kothrud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक
1

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक

Jhansi Crime : पैसे मागितले म्हणून तिसऱ्या पत्नीची हत्या करून केले तुकडे, मृतदेह जाळला अन् हाडं पाठवली पहिल्या पत्नीला
2

Jhansi Crime : पैसे मागितले म्हणून तिसऱ्या पत्नीची हत्या करून केले तुकडे, मृतदेह जाळला अन् हाडं पाठवली पहिल्या पत्नीला

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार
3

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार

शरीरातील हाडं तुटली, दात तुटले, हिमोग्लोबिन अवघे १.९! CRPF च्या घरी काम करणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, मृत्यूशी देतेय झुंज
4

शरीरातील हाडं तुटली, दात तुटले, हिमोग्लोबिन अवघे १.९! CRPF च्या घरी काम करणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, मृत्यूशी देतेय झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.