छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा
व्हिडिओत काय?
डीजीपी रामचंद्र राव (DGP Ramchandra Rao) हे सरकारी ऑफिसामध्ये आणि गणवेशात असल्याचे दिसून येत आहे. यामधील महिलेला मिठी मारत असताना आणि तिचे चुंबन घेत असतांना ते दिसत आहे. हा व्हिडीओ गुप्तपणे रेकॉर्ड करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची पाळेमुळे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहेत.
डीजीपी राव यांनी दिले स्पष्टीकरण
डीजीपी रामचंद्र राव यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. “हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. माझी बदनामी करण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे घडवून आणले आहे. काही लोक मला जाणून-बुजून त्रास देत आहेत.” असा दावा त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या प्रसंगी महिला त्यांच्या कार्यालयात वेगवेगळे कपडे घालून येत असत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री संतापले
या प्रकरणामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या संतापले आहेत. या प्रकरणाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली असून राव यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या नैतिकतेविषयी प्रश्न विचारले जात आहेत.
मुलीच्या गोल्ड स्मगलिंग प्रकरणामुळे चर्चेत
रामचंद्र राव (DGP Ramchandra Rao) यांचं नाव पहिल्यांदाच वादात सापडलेल नाही. यापूर्वी त्यांची मुलगी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव (Ranya rao) हिला विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. मार्च 2025 मध्ये या प्रकरणामुळे रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले होते. रान्याने आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून तस्करीचे नेटवर्क तयार केल्याचा आरोप तपासात करण्यात आला होता. आता आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने रामचंद्र राव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Ans: व्हिडिओत DGP रामचंद्र राव सरकारी कार्यालयात गणवेशात एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: राव यांनी हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून बदनामीसाठी मुद्दाम पसरवण्यात आल्याचा दावा केला आहे.
Ans: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.






