
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे चार ते पाच मित्र रात्री पार्टीसाठी जमले होते. पार्टीत चेष्टेतून वाद पेटला आणि हाच वाद विकोपाला गेला. एका मित्राने विशाल चव्हाण यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे विशालचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या इतर मित्रांनी त्याचा मृतदेह डोणजे परिसरातील रस्त्याच्या पुलाखाली टाकून दिला.
Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना
या मृतदेहाची माहिती बुधवारी हवेली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले. हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणासाठी केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. किरकोळ वादातून हत्या झाली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत विशालवर आधीही गुन्हे दाखल आहे. पोलीस या अँगलने सुद्धा तपास करत आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली; तर विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीच्या भावाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने केलेले कृत्य गंभीर आणि निंदनीय असून, समाजात योग्य संदेश जाण्यासाठी कठोर शिक्षा ठोठावणे आवश्यक आहे, असे नमूद करत जुन्नर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी हा निकाल दिला.
या घटनेपूर्वी, पीडितेचे कुटुंब आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्या रागातून आरोपीने पीडितेच्या घरात बेकायदा घुसून तिला शिवीगाळ केली. पीडितेने त्याला घरात कोणी नसल्याचे सांगून बाहेर काढून दरवाजा बंद केला. मात्र, आरोपीने दरवाजा ढकलून पीडितेचा विनयभंग केला; तर आरोपीच्या भावाने तिला मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Ans: पुण्यातील खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी येथे.
Ans: विशाल संजय चव्हाण, वय २५ वर्षे.
Ans: पार्टीदरम्यान चेष्टेतून सुरू झालेल्या किरकोळ वादातून.