पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…
नेमकं काय प्रकरण?
पीडित महिलेचं लग्न 25 मे 2025 रोजी झाले होते. ४ जून रोजी ती पतीच्या संयुक्त कुटुंबात नांदण्यासाठी आली होती. सुरुवातीला सर्व काही चंगळ असल्यासारखं तिला वाटले. पण काही दिवसात सासरच्या घरातील वातावरण बदललं. तिचा छळ करायला सुरुवात झाली. सासरे सुभाष तायडे हे घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पीडितेच्या जवळ येत तिच्या अंगाला स्पर्श केला, असा आरोप आहे. पाठीवर,खांद्यावर आणि कंबरेवर हात फिरवत “तुला जे हवे ते देईन, तुझ्या नवऱ्यात काही दम नाही,” असं आरोपी सासरा सुनेला म्हणाला. दीर शुभम तायडे विनाकारण पीडित महिलेच्या खोलीत यायचा. सौंदर्यावर,कपड्यांबाबत आणि लज्जास्पद नजरेने तो पाहायचा. ती या सगळ्याला घाबरून स्वतःला खोलीत बंद करून घेत होती. असं तक्रारीत पीडित महिलेने म्हंटल आहे.
बाबांच्या मनासारखे राहा…
तिने हा सगळा प्रकार सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे यांना सांगितला. मात्र त्यांनीही तिला तक्रार न करता तडजोड करण्याचा सल्ला दिला. “बाबांच्या मनासारखे राहा,तसे केल्यास घरात सुखाने राहशील,”असे सांगून मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पती ऋषभ तायडे कोणताही विरोध न करता “वडील सांगतील तसे वागावे लागेल,”असं पत्नीला सांगितल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तिने समाजात बदनामी होईल या भीतीने कोणाकडेही तक्रार केली नाही मात्र नंतर 30 ऑक्टोबर 2025 रोजी पतीने पत्नीला (पीडित महिला) माहेरी पाठवले. मानसिक धक्का,भीती आणि समाजात बदनामी होईल या कारणांमुळे उशिरा तक्रार केल्याचे सांगत पीडितेने न्यायाची मागणी केली आहे.
गुन्हा दाखल
सासरे सुभाष तायडे,दीर शुभम तायडे, सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे आणि पती ऋषभ तायडे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून. तपास करत आहे,
पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले
Ans: समाजात बदनामी होईल या भीतीमुळे आणि मानसिक धक्क्यामुळे तक्रार उशिरा दिली.
Ans: सासरे, सासू, दीर, वहिनी आणि पती असे एकूण पाच जण आरोपी आहेत.
Ans: खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






