काय नेमकं प्रकरण?
वासंती आणि मुलगा उमेश यांच्यात सातत्याने कौटुंबिक वाद होत होती. आरोपी उमेश हा कर्जबाजारी होता. त्याने विविध बँका आणि बचत गटांकडून कर्जे घेतली होती. त्यावरून मायलेकांमध्ये वाद आणि भांडण व्हायचे. बुधवारी रात्री वासंती या घरासमोरील अंगणात बसल्या होत्या. तेव्हा आरोपी उमेशने त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. ही गोळी वासंती यांच्या थेट छातीत घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरु
जागृती जयेश सरमळकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. वेंगुर्ला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…
कोकणवासियांसाठी मोठी बातमी! 3 फेब्रुवारीपर्यंत ‘हा’ मार्ग राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
सावंतवाडी: दाणोली-बावळाट ते बांदा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मागांची व्यवस्था करण्यात आली आहे. अवजड वाहने आता बेळगाव-वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्गावरून सावंतवाडी मार्गे जातील, तर हलकी वाहने सातुळी पूल, ओटवणे आणि माजगाव मार्गे सावंतवाडीला जाऊ शकतील. दाणोली ते बांदा वा १६ किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर गावात.
Ans: मृत महिलेचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर.
Ans: कर्जावरून मायलेकांत सुरू असलेले सततचे वाद.






