दोन्ही बाजूने गुन्हा दाखल
गोळीबार प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गटातर्फे हॉटेल चालक कमलप्रितसिंग सिंधु यांनी फिर्याद दिली की, यात्रेकरूंसोबत सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेले होते. एका ३० ते ३५ वर्षीय यात्रेकरुने त्यांच्यावर पिस्तूल झाडून जखमी केले. यावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला.
तर दुसऱ्या बाजूने पंजाबमधील रहिवासी लवप्रीतसिंग चहल यांनी फिर्याद दिली की, जुन्या वादाचा राग मनात धरून स्थानिकांनी त्यांच्यावर तलवारी आणि काठ्यांनी हल्ला केला.
दोन्ही गटातील १० आरोपींवर अटकेची कारवाई
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गाठले. परिसरात तणावाची परिस्थतीत निर्माण झाली होती, पोलिसांनी निर्माण झालेली परिस्थतीत नियंत्रणात आणली आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाच पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फुटेज, सायबर सेलचे तांत्रिक विश्लेषण आणि नॅटग्रिड माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यामध्ये अकोला, अर्धापूर, बीदर आणि पंजाबमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी अकोला आणि बुलढाणा पोलिसांच्या मदतीने आरोपींचा पाठलाग करून मुख्य आरोपींसह सात जणांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील 10 आरोपींवर अटकेची कारवाई केली आहे. यात गोळीबार करणाऱ्या सात यात्रेकरू आणि दुसऱ्या गटातील तीन स्थानिक आरोपींचा समावेश आहे. अत्यंत संवेदनशील अशा या घटनेचा तपास कौशल्याने करून आरोपींना तातडीने जेरबंद केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
Ans: नांदेडमधील लंगर साहेब गुरुद्वारा (नगीना घाट) परिसरात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.
Ans: दोन गटांतील वादातून भररस्त्यात गोळीबार व मारहाण झाली, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
Ans: सीसीटीव्ही, सायबर तपास व नॅटग्रिड माहितीच्या आधारे 24 तासांत दोन्ही गटांतील एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली.






