ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक; मोबाईलवर मेसेज पाठविला अन्…
काय घडलं नेमकं?
रवींद्र अधिक पवार यांनी आपला ११ महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीपासून मुलाची आई पूजा हिच्या वागणुकीवर संशय होता. पोलिसांनी पूजाची चौकशी केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
कशी केली हत्या?
आरोपी महिलेने मुलाला सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने मुलाचा मृतदेह एका कापडाच्या बॅगेत भरला. बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने त्यात जड दगडही भरले आणि ती बॅग गावातील एका विहिरीत फेकून दिली.
का केली हत्या?
मला दुसरे लग्न करायचे आहे आणि जर मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही, म्हणून तिने बाळाची हत्या केली.
आरोपी अटकेत
पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिला पूजा पवार हिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.






