Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या

Pune Crime: पोलीस हवालदार बाबा दांगडे आणि संतोष अनुसे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फरार आरोपी अभिषेक काळे हा पांढऱ्या रंगाचा चौकटी लायनिंगचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट घालून मॉडर्न कॉलेज परिसरात फिरत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 13, 2026 | 06:05 PM
Pune Crime, Vishrambaug Police Station, Crime Branch

Pune Crime, Vishrambaug Police Station, Crime Branch

Follow Us
Follow Us:
  • विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील ३ वर्षांपासून फरार आरोपी अभिषेक संजय काळे याला अटक
  • १६ जुलै २०२३ रोजी दांडेकर पुलाजवळ कोयत्याने मारहाण करून आरोपी झाला होता फरार
  • IPC १४३, १४८, ३२४ व आर्म्स ॲक्ट अन्वये विश्रामबाग पोलिसांत दाखल होता गुन्हा
म विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गंभीर गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक संजय काळे (वय २७ वर्षे, रा. सर्वे नं. १३४, दांडेकर पूल, लोकमान्य नगर समोर, पुणे) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

तीन वर्षांपूर्वी १६ जुलै २०२३ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुलाजवळील मांगिरबाबा चौक येथील खराडे वडापाव सेंटर समोरील सार्वजनिक रस्त्यावर मयुर शिवाजी पिलाने, अनिल दिनकर शिंदे, सौरभ संजय काळे व इतर दोन इसम एकत्र जमले होते. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ, आरडाओरडा करून कोयत्याने मारहाण केली तसेच बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग केला होता.

Karad News : सह्याद्री कारखाना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज; बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५९/2०२३, भारतीय दंड संहिता कायदा कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक काळे हा घटनेपासून मागील तीन वर्षांपासून फरार होता.

पोलिसांची कारवाई आणि सापळा

गुन्हे शाखा युनिट-१ चे अधिकारी व अंमलदार पुणे शहरात गस्तीवर असताना, पोलीस हवालदार बाबा दांगडे व संतोष अनुसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाहिजे आरोपी अभिषेक काळे हा सध्या मॉडर्न कॉलेज परिसरात आला असून त्याने पांढऱ्या रंगाचा चौकटी लायनिंगचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट घातली आहे.

ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने नमूद ठिकाणी सापळा रचून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आरोपीला ताब्यात घेतले.

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

पुढील कायदेशीर कारवाई

गुन्हे शाखा युनिट-१ कार्यालयात आणून चौकशी केली असता, सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. परंतु, अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास समर्थ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक पोलीस निरीक्षक धिरज राऊत, तसेच पोलीस अंमलदार बाबा दांगडे, संतोष अनुसे, प्रमोद जगताप, भुजबळ, अशिष खरात, उमेश शेलार, संतोष नागरे आणि अतुल साळवे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

 

 

Web Title: Pune crime branch unit 1 arrests absconding accused abhishek kale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
1

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
2

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.