Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Pune Crime: पोलीस तपासादरम्यान, चोरटे मंदिराच्या उघड्या भिंतीच्या मार्गाने परिसरात घुसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 06:22 PM
Pune Crime News

Pune Crime News

Follow Us
Follow Us:
  • पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात चोरीची घटना 
  • या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय 
  • फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
Pune Crime: पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करून दानपेट्यांमधील सुमारे ५० ते ६० हजार रुपयांची रोख रक्कम पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime) ही चोरी सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री ११:३० ते मंगळवारी (६ ऑक्टोबर) पहाटे ५:१५ च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी मंदिर उघडताना उघडकीस आला प्रकार

मंदिराचे ट्रस्टी व पुजारी हेरंब दत्तात्रय ठकार (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सोमवारी रात्री १०:३० वाजता नित्यनियमाप्रमाणे मंदिर बंद केले होते. मंगळवारी पहाटे जेव्हा ते मंदिर उघडण्यासाठी आले, तेव्हा मुख्य गर्भगृहात जाणाऱ्या लाकडी दरवाजाची कडी तुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आत जाऊन पाहणी केली असता चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला …

लोखंडी रॉडच्या साह्याने दानपेट्या उचकटल्या

चोरट्यांनी मुख्य गर्भगृहापुढील दोन लाकडी दानपेट्यांसह महादेव मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील दानपेट्यांचे ताले तोडले होते. याशिवाय मारुती मंदिराशेजारी ठेवलेली लोखंडी दानपेटीही फोडण्यात आली. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर केला असून, तो रॉड घटनास्थळीच आढळून आला आहे.

उघड्या भिंतीवरून मंदिरात प्रवेश; पोलिसांकडून सीसीटीव्हीची पाहणी

पोलीस तपासादरम्यान, चोरटे मंदिराच्या उघड्या भिंतीच्या मार्गाने परिसरात घुसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या फरासखाना पोलीस मंदिर परिसर आणि परिसरातील दुकान व आस्थापनांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा: Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भेकराईनगर परिसरात हा प्रकार समोर आला आहे. 

Web Title: Unidentified thieves stole money from pune kasba ganpati temple police find criminals tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police
  • Theft Case

संबंधित बातम्या

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
1

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
2

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
3

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
4

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.