Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

गुटखा विक्रीप्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यानेच तब्बल पावणे दोन लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला असून, एका किराणा दुकानदाराला गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन तसेच त्याला पोलीस ठाण्यात बोलवून त्रास दिल्याचेही उघड झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2026 | 01:45 PM
पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास
  • गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी
  • पुण्यातील घटनेनं खळबळ
पुणे : गुटखा विक्रीप्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यानेच तब्बल पावणे दोन लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला असून, एका किराणा दुकानदाराला गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन तसेच त्याला पोलीस ठाण्यात बोलवून त्रास दिल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारानंतर वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेत पोलिसासह दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अंमलदार रामकिशन हंबर्डे आणि खासगी व्यक्ती सतीश मोरे (रा. वडकी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यावसायिकाने फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिस अंमलदार हंबर्डे हा २०१४ मध्ये भरती झाला आहे. त्याची नेमणूक फुरसूंगी पोलिस ठाण्यात होती. तो पोलिस ठाण्याच्या सायबर सेलमध्ये कर्तव्यास होता. दरम्यान, तक्रारदारांचे उरूळी देवाची परिसरातील सह्याद्री चौकात किराणा दुकान आहे. तीन दिवसांपुर्वी (दि. ८ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास हंबर्डे आणि खासगी व्यक्ती गेले. त्यांनी पोलिस असल्याचे सांगत दुकानदाराकडे गुटखा विक्रीबाबत विचारणा केली. नंतर दुकानातील अतिरिक्त माल ठेवलेल्या खोलीतून विमल सुगंधी सुपारीच्या दोन गोण्या ताब्यात घेतल्या. नंतर गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी ५ लाखांची खंडणी मागितली. या व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात देखील आणले.

एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतर सेटलमेंट करून व्यावसायिकाकडून १ लाख ६५ हजार रुपये तडजोडीत घेतले. पैसे घेतल्यानंतर गुटखा परत देखील केला. परंतु, पुन्हा व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलवून प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. आणखी पैसांसाठी हा त्रास दिल्याची माहिती आहे. या त्रासानंतर संबंधित व्यावसायिकानेच थेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली.

या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली. तेव्हा स्टेशन डायरी किंवा याप्रकाराबाबत पोलिस ठाणे स्थरावर कोणालाही काही न कळविल्याचे समोर आले. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून थेट पोलिस अंमलदारासह दोघांवर खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसूंगी पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

दुकानातील कॅमेऱ्यात संभाषण कैद

दुकानातील कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरोपी पोलिस हंबर्डेचे संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. सायबरचे कर्तव्य असताना देखील तो साध्या वेशात या दुकानात पोहचला होता. दुकानदाराचा नोकर १ लाख ६५ हजार रुपये घेऊन आला होता. ते पैसे पोलिसाने घेतले आहेत. नंतर दुकानदाराच्या गुटख्याच्या गोण्या त्याने परत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: A police employee in pune has extorted money from a shopkeeper nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
1

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना
2

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
3

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक
4

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.