crime (फोटो सौजन्य : social media)
पूणयच्या देहूरोड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. हत्या झालेल्या मुलाचा चुलत भाऊ देखील या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे आहे. तर सनी सिंग (वय- 19, रा. गंभीरपूर, जि. गोपालगंज, बिहार) असे आरोपीचे नाव आहे. दिलीपच्या चुलत भावाचा नाव अरुण मोरया ( वय १४ )
Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; भरधाव कारने तरुणीला चिरडले
नेमकं प्रकरण काय?
आपल्या मैत्रिणीसोबत दिलीप याचे सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाचा सनी सिंगला राग होता. त्याने बुधवारी रात्री साडे १० च्या सुमारास दिलीप याला थॉमस कॉलनी येथील मोकळ्या मैदानात भेटायला बोलावले. यावेळी दिलीप आणि दिलीपचा चुलत भाऊ गेले. दिलपने आपल्या चुलत भावाला सोबत नेलं होतं. यावेळी सानी सिंग आणि दिलीप यांच्यात प्रेमसंबंधातून मोठा वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि सानी सिंग याने दिलीपच्या गळ्यावर चाकूने वार केला आहे. त्यावेळी त्याच्या चुलतभावावरही वार केला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दिलीपची हत्या सनी सिंगने प्रेमप्रकरणातून केली. दिलीप आणि सनी सिंग एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होते. गेल्या तीन महिन्यापासून त्या मुलीने सानिशी बोलणे बंद केले होते. ती मुलगी दिलीपच्या संपर्कात असल्याने संतापलेल्या आरोपी सनी सिंग राजपूत गुजरात मधून देहूरोड आला आणि तिथे त्याने दिलीपची हत्या केली. त्यानंतर त्याने दिलीपचा चुलत भाऊ याला सुद्धा चाकूने वार करत गंभीर जखमी केले. हे सगळं करून तो गुजरातला पळून गेला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरु केला तेव्हा सनी सिंग राजपूतच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे सनी गुजरातमधील वडोदरा येथील एका स्टील कंपनीच्या गोदामात लपून बसल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केला असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिलीप याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती तर आरोपी सनी सिंग हा खासगी कंपनीत कामाला आहे.
Kanpur News: ‘साहेब, मी जिवंत आहे… माझं पोस्टमॉर्टम थांबवा!’ कानपूरमधील विचित्र प्रकार