Uttar Pradesh News: कानपूरच्या घाटमपूर पोलिस स्टेशन परिसरात एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने थेट पोलिस स्टेशन गाठून विनंती केली, “साहेब, मी जिवंत आहे… कृपया माझं पोस्टमॉर्टम थांबवा.” ही घटना ऐकताच उपस्थित पोलिसांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
घाटमपूर परिसरात गुरुवारी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. काही वेळातच सुमन नावाच्या महिलेनं घाटमपूर पोलिस ठाण्यात येऊन मृतदेहाची ओळख तिच्या भावासारखी असल्याचे सांगितले. मृत व्यक्तीने लाल शर्ट आणि काळी पँट घातली होती. सुमन म्हणाली, “हे कपडे माझ्या भावाचेच आहेत आणि चेहराही जुळत आहे.” त्यामुळे पोलिसांनी मृतदेह अजय शंखवार या नावाने ओळखून शवविच्छेदनासाठी पाठवला.
मात्र, थोड्याच वेळात सर्वांना धक्का देणारी घटना घडली. भितरगाव परिसरातील वीटभट्टीवर काम करणारा इदुरखू गावातील अजय शंखवार थेट पोलिस स्टेशनमध्ये आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. अजयने आपण जिवंत असल्याचे सांगितले. तसेच घडलेला प्रकारसह सांगितला. अजयने सांगितले की, “माझ्याकडे मोबाईल नाही. त्यामुळे महिन्यातून दोन-चार वेळाच घरी फोन करतो. आज पोलिस भट्टीवर आले आणि माझ्याबाबत चौकशी करत होते. त्यांना पाहून मलाही आश्चर्य वाटलं.”
पोलिसांनी त्याला सांगितलं की, त्याच्या बहिणीने एका मृतदेहाची ओळख अजय शंखवार म्हणून केली आहे. त्यामुळे त्याने त्वरित घाटमपूर पोलिस स्टेशन गाठून स्वतः जिवंत असल्याचा पुरावा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे मृतदेह कोणाचा आहे, याचा तपास पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला आहे. सध्या घाटमपूर पोलिस बेवारस मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय तपासणी कऱण्यात येणार आहे.
घाटमपूरमधील अजय शंखवार नावाच्या तरुणाने थेट पोलिस स्टेशन गाठून आपण जिवंत असल्याची माहिती दिली. अजय शंखवार भितरगाव येथील वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतो. त्याच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तो आठवड्यातून एक-दोन वेळा दुसऱ्याच्या फोनवरून कुटुंबाशी संपर्क साधतो. शुक्रवारी, पोलिस जेव्हा त्याच्या शोधात वीटभट्टीवर पोहोचले, तेव्हा अजय जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं.
त्यापूर्वू घाटमपूरमधील चौकात एक बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आला आणि तो अजय शंखवार यांचा असल्याचे सांगितले जाऊ लागले. अजयच्या बहिणीनेही संबंधित मृतदेह अजयचा असल्याचा दावा केला. त्यानुसार पोलिसांनी पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू केली होती. मात्र अजय पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सर्वच हादरले.
घाटमपूरचे एसीपी कृष्णकांत यादव यांनी सांगितले की, मृतदेहाची ओळख पटवण्यात चूक झाली होती. आता पुन्हा एकदा त्या मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अजयच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्येही ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.