सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : बेदरक व निष्काळजी ट्रक चालकामुळे गंगाधाम चौकात दुचाकीस्वार सासऱ्यांना व सूनेला चिरडल्याची घटना ताजी असताना आणखी एक अशीच घटना घडली असून, बेदरक आणि निष्काळजी टुरिस्ट कार चालकाने फुटपाथवरून पायी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणीला धडक दिली आहे. यात तरुणीचा जागीचं मृत्यू झाला आहे. कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये भरदुपारी ही घटना घडली असून, कार चालवण्याचे मित्राकडून शिक्षण घेताना ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे.
श्रेया गौतम येवले (२१, शीतल हाईट्स, खंडोबा मंदिर जवळ, कोंढवा) असे अपघातात मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारमालक व चालविणाऱ्या त्याचा मित्राला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती राहण्यास कोंढवा- कात्रज रस्त्यावरील एका सोसायटीत होती. ती शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सुखसागरनगर येथील यशश्री सोसायटीच्या समोरील फुटपाथवरून पायी चालत जात होती. दुपारची वेळ होती. त्यामुळे काही नागरिक देखील रस्त्याच्या कडेला उभारले होते. तेव्हा भरधाव कार फुटपाथावर चढून तिने प्रथम एका नाराळाच्या झाडाला धडक दिली. नंतर कारने श्रेया यांना धडक दिली आणि एका बदामाच्या झाडाला धडकली.
श्रेया बदामाच्या आणि कारच्या मध्ये अडकली. ज्यात तिला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. चालक सतीश होनमाने (३७, रा. गोकुळ नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, धायरीतील घटना; चालकावर गुन्हा दाखल
असा झाला अपघात
कात्रज सुखसागर नगर परिसरामध्ये यशश्री सोसायटीच्या समोरील फुटपाथवरून पायी चालत जात होती. कारचा स्पीड इतका होता की, कार मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसली. तिने नारळाचे झाड तोडून पादचारी श्रेयाला धडक दिली. समोर असणारे बदामाचे झाड व कारमध्ये सापडून मुलीचा जागीच मृत्यू झाला. कारचा स्पीड जास्त होता. त्यामुळे धडकेनंतर मोठा आवाज झाला.
…म्हणून झाला अपघात
सतीश होनमाने कंपनीची कार भाडे तत्वावर चालवत होता. ती कार त्याचे नातेवाईक दत्तात्रेय भरत गाडेकर (४५, रा. शिक्षक सोसायटी, गोकुळ नगर, कात्रज) यांना शिकवत असताना अपघात झाला. ज्यात श्रेयाचा जागीच मृत्यू झाला.